Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भ्रष्टाचारासाठी कॉंग्रेसने देशवासीयांची माफी मागावी

भ्रष्टाचारासाठी कॉंग्रेसने देशवासीयांची माफी मागावी

=भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांची मागणी=
GVL Narsimha Raoनवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] – कॉंग्रेस आणि भ्रष्टाचार हे समानार्थी शब्द झाले असून, या पक्षाची ओळख आता इंडियन नॅशनल कॉंग्रेस पार्टी अशी न होता, इंडियाज नॅचरली करप्ट पार्टी अशी झाली असल्याचा घणाघाती हल्ला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी आज मंगळवारी येथे पत्रपरिषदेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी आणि परदेशात भारताची प्रतिमा उजळण्यासाठी झटत असताना, कॉंग्रेस राजवटीतील भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे उजेडात येत आहेत, याकडे लक्ष वेधत नरसिंहराव म्हणाले की, भारतातील व्यावसायिक प्रवेशासाठी आपल्याला १२५ कोटी रुपयांची लाच द्यावी लागली, या आरोपाने भारताची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे. संपुआ सरकारच्या कार्यकाळातील हे प्रकरण असून, याची जबाबदारी तत्कालीन सरकारला टाळता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणासाठी कॉंग्रेसने देशवासीयांची माफी मागितली पाहिजे.
एकीकडे देशातील चिल्लर किराणा दुकानदारांचे हित जपण्याचा आव आणत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहितात, तर दुसरीकडे वॉलमार्टसारख्या विदेशी कंपनीला भारतात प्रवेश देण्यासाठी सरकारतर्फे पावले टाकली जातात, हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, असा आरोप नरसिंहराव यांनी केला. कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराची ही साखळी राजीव गांधीपासून राहुल गांधीपर्यंत आली आहे, असे ते म्हणाले.
सुधांशू द्विवेदी
भाजपावर आरोप करताना कॉंग्रेस वस्तुस्थितीचा विपर्यास करीत असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू द्विवेदी यांनी केला. कॉंग्रेसचे आरोप वस्तुस्थितीला आणि ऐतिहासिकतेला धरून नाहीत, असे भाजपा नेते सुधांशू द्विवेदी म्हणाले.
जी प्रकरणे भाजपा राजवटीत घडली नाही, वा ज्यांचा भाजपा सरकारशी दुरान्वयानेही संबंध नाही, त्यांचेही खापर भाजपावर फोडण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप द्विवेदी यांनी केला. कलबुर्गी यांची हत्या कर्नाटकात झाली, तेथे कॉंग्रेसचे शासन आहे. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या राजवटीत झाली, तर दादरी हत्याकांड उत्तरप्रेदशात घडले, त्याठिकाणी समाजवादी पार्टीचे राज्य आहे, तरीसुद्धा या घटनांसाठी भाजपाला जबाबदार धरले जात आहे, जे योग्य नाही, असे द्विवेदी म्हणाले. कॉंग्रेसने भाजपावर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही द्विवेदी यांनी दिला. बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपा नेते विधाने करीत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप त्यांनी खोडून काढला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25219

Posted by on Oct 21 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1313 of 2453 articles)


=नितीशकुमारांचे महिलांना अजब आवाहन= फुरवार शरीफ, [२० ऑक्टोबर] - पहिल्या दोन टप्प्यांमधील मते भाजपाच्या पारड्यात गेल्याचे स्पष्ट झाल्याने महाआघाडीत जणू ...

×