Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मंगळवारपासून धावणार गतिमान एक्सप्रेस

मंगळवारपासून धावणार गतिमान एक्सप्रेस

=ताशी १६० किमीचा वेग=
Gatimaan expressआग्रा, [२ एप्रिल] – देशातील सर्वाधिक गतीने धावणारी दिल्ली ते आग्रा ही पहिली गतिमान एक्सप्रेस येत्या मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. अवघ्या एका तासात १६० किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता असलेली ही गाडी देशातील सर्वाधिक वेगाने धावणारी ठरणार आहे.
ही गतिमान एक्सप्रेस सर्वप्रथम राजधानी दिल्लीतील हजरत निजामुद्दिन ते आग्रा कंन्टोन्मेंट या मार्गावर धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मंगळवारी सकाळी १० वाजता या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. त्यानंतर या एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलविण्यात येणार आहे. ही रेल्वे हजरत निजामुद्दिन येथून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि ९ वाजून ५० मिनिटांनी आग्रा कंन्टोन्मेंटला पोहोचेल. त्याचप्रमाणे आग्रा कंन्टोन्मेंट येथून सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी ही गाडी दिल्लीकडे निघेल आणि ७ वाजून ३० मिनिटांनी निजामुद्दिन येथे दाखल होईल.
या गतिमान एक्सप्रेसमध्ये १२ वातानुकुलित डबे असून, त्यांना स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय आदी सुविधाही राहणार आहेत. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही एक्सप्रेस धावणार आहे. गतिमान एक्सप्रेसच्या प्रवासाचे भाडे शताब्दी एक्सप्रेसपेक्षा जास्त राहणार आहे.
नजीकच्या भविष्यातच कानपूर-दिल्ली, चंदीगड-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-बिलासपूर, गोवा-मुंबई आणि नागपूर-सिकंदराबाद अशा नऊ मार्गांवरही गतिमान एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्तावावर रेल्वे मंत्रालय विचार करीत आहे, अशी माहिती रेल्वेतील उच्चस्तरीय सूत्राने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27665

Posted by on Apr 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (541 of 2453 articles)


=भारताने चीनला ठणकावले= वॉशिंग्टन, [२ एप्रिल] - संयुक्त राष्ट्रसंघाच्या काळ्या यादीत पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद ...

×