मंगळावर सापडला नासाच्या यानाला खनिज साठा
Friday, November 7th, 2014वॉशिंग्टन, [६ नोव्हेंबर] – मंगळावर अभ्यासासाठी सोडलेल्या अमेरिकेच्या रोव्हर क्युरिसिटी बग्गीला खनिजांचा साठा सापडला आहे. मंगळावर पहिल्यादांच खनिज साठा सापडला आहे. अशी माहिती ‘नासा’ने दिली.
क्युरिसिटी या बग्गीने मंगळावरील ‘माउंट शार्प’ या परिसरातील एका डोंगरावर ड्रिलिंग केले असता तिथे लाल रंगाची पावडर सापडली. या बग्गीने पावडरचे नमुने गोळा केले आहेत. या बग्गीत रसायन व खनिजांची तपासणी करणारी यंत्रणा तयार आहे. हे खनिज ‘हिमीटाइट’ या नावाने ओळखल्या जाते. यात लोखंड आणि ऑक्साइडचे मिश्रण आहे.
२०१० मध्ये नासाच्या ‘मार्स रिकॉनसन्स’ यानात खनिजांची तपासणी करण्यासाठी खास यंत्रणा होती. या यानाने ‘हिमीटाइट’ हे खनिज असल्याचे पुरावे दिले होते. या खनिजांमुळे मंगळावरील प्राचीन पर्यावरणाची माहिती मिळू शकेल, असे क्युरिसिटी प्रकल्पाचे संशोधक जॉन ग्रोटझिंगर यांनी सांगितले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=17892

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!