Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मंत्री होण्यासाठी खासदार, आमदार असणे बंधनकारक नाही

मंत्री होण्यासाठी खासदार, आमदार असणे बंधनकारक नाही

=सुप्रीम कोर्टाने फेटाळली आव्हान याचिका=
supreme_courtनवी दिल्ली, [१ जुलै] – संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला केंद्र किंवा राज्य मंत्रिमंडळात नियुक्त करण्याच्या प्रथेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी फेटाळून लावली.
कोणतीही व्यक्ती मंत्री म्हणून शपथ घेऊ शकते. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला संसद किंवा विधिमंडळावर निवडून येणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट तरतूद आपल्या राज्यघटनेत आहे, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. अमिताव रॉय यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच ही प्रथा चालत आलेली आहे, असे नमूद करताना न्यायासनाने बिहारमधील वकिलाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. पाटणा उच्च न्यायालयाने त्याची याचिका खारीज केल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत ज्यांना लोकांनी निवडूनच दिले नाही, त्यांना मंत्री बनविण्याच्या प्रथेवर तत्काळ बंदी घालण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका त्याने २००४ मध्ये पाटणा उच्च न्यायालयात दाखल केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23221

Posted by on Jul 2 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1583 of 2453 articles)


ब्रसेल्स, [१ जुलै] - गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसने देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे २.२१ लाख कोटी रुपयांचे नवे ...

×