Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » मंत्रोच्चारात पुजार्‍याच्या हस्ते मशिदीचे भूमिपूजन

मंत्रोच्चारात पुजार्‍याच्या हस्ते मशिदीचे भूमिपूजन

28_09_07_23_pandit_in_masjit_H@@IGHT_158_W@@IDTH_209ग्रेटर नोएडा, [३ एप्रिल] – भारत माता की जय वरून देशात आधीच वातावरण चिघळले असताना येथून जवळच असलेल्या खेरली भाव गावात शनिवारी मंत्रोच्चारात एका पुजार्‍याच्या हस्ते मशिदीचे भूमिपूजन करण्यात येऊन हिंदू-मुस्लिम बंधुभावाचा व धार्मिक एकतेचा नवा आदर्श गावकर्‍यांनी देशासमोर ठेवला. यावेळी पूजा करताना मुस्लिमांनी हाताला गंडाही बांधला व नंतर प्रसाद वाटपही करण्यात आले.
खेरलीत एक मशीद असून ती आता जुनी झाली आहे आणि लहानही पडत आहे. त्यामुळे नवीन मोठी मशीद बनवण्याचा निर्धार येथील मंदिरातील महेंद्र गिरी नावाच्या पुजार्‍याने केला. एवढेच नाही तर शनिवार २ रोजी चांगला मुहूर्त असल्याचे सांगून आसपासच्या गावातील दोन्ही धर्माच्या लोकांना बोलावून मंत्रोच्चार तसेच नागदेवतेची पूजा करून भूमिपूजन करण्यात आले.
राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी दोन्ही समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करीत असताना तीन हजार लोकवस्तीच्या खेरली गावात हिंदू-मुस्लिमांची संख्या बरोबरीची असून कोणतेही मतभेद वा भांडण नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.
संघर्षापासून दूर राहण्याचा निर्धार
मशिदीच्या भूमिपूजनानंतर रबपुरा येथे शेतकरी नेते ठाकूर धीरेंद्रसिंह यांच्या निवासस्थानी किसान पंचायतीचे आयोजन करण्यात आले. जात-धर्माच्या नावावर दुफळी न माजू देता शांतता व बंधुभाव टिकवण्यासाठी संघर्षापासून दूर राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
परिसरातील १०० गावांतील नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू पुजार्‍याच्या हातून मशिदीचे भूमिपूजन करण्यात आले व यावेळी मौलानाही सोबत बसलेले पाहून अत्यानंद झाल्याचे मत ठाकूर धीरेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27688

Posted by on Apr 4 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (535 of 2453 articles)


=तृणमूल महासचिवांचा हल्लाबोल= कोलकाता, [३ एप्रिल] - राहुल गांधी यांनी शनिवारी येथे एका प्रचारसभेत तृणमूल कॉंग्रेसवर टीका केल्यानंतर, राहुल गांधी ...

×