Home » ठळक बातम्या, नागरी, फिचर, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!

मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!

=हिंदू सेवाभावी व परोपकारी समाज : सरसंघचालकांचे आवाहन=
dr mohanji bhagwat2खरगौन, [११ फेब्रुवारी] – हिंदू हा सेवाभावी आणि परोपकारी समाज आहे. भारताला मजबूत राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्व हिंदूंनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय भारत मजबूत होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नर्मदा नदीच्या तीरावर वसलेल्या ऐतिहासिक महेश्‍वर शहरात ‘नर्मदा हिंदू संगम’ला संबोधित करताना ते बोलत होते.
सरसंघचालक पुढे म्हणाले, आपसातील मतभेदांना महत्त्व देण्यापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. फार पूर्वी भारताची ओळख जगद्गुरू अशी होती. भविष्यातही भारत जगद्गुरू म्हणूनच ओळखला जाईल. अमेरिकेकडे पैसा आणि व्यवसायाची ताकद आहे, चीनकडे लष्करी सामर्थ्य आहे, तर भारत हा असा एकमेव देश आहे, ज्या देशात सर्वच काही आहे, असेही त्यांनी सांगितले.
समाजातील काही घटकांना आजही मंदिरात येऊ दिले जात नाही आणि विहिरीतून पाणीही काढू दिले जात नाही, यावर सरसंघचालकांनी गंभीर चिंता व्यक्त केली. आपली श्रद्धास्थाने वेगवेगळी असली, तरी परमेश्‍वर एकच आहे, यावर आपल्या सर्वांचाच दृढ विश्‍वास आहे. संपूर्ण जगाला आपण ‘हे विश्‍वची माझे घर’ समजतो. त्यामुळे या देशात आपण एकत्रितपणे राहायला हवे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
भारतात विविधता आहे, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, प्रत्येकाचा जीवन जगण्याचा मार्गही वेगळा आहे. पण, हिंदू नेहमीच समाजाची सेवा आणि समाजाच्या कल्याणासाठी संघटित राहिला आहे. जगातील कुणीही हिंदूंना कमकुवत समजण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगताना ‘हिंदू संगम’सारखे कार्यक्रम केवळ हिंदूंना बळकट करण्यासाठीच असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपला भारत देश जगाला मार्गदर्शन करीत असतो. पण, हे जग सत्य नाही, तर शक्तीपुढे नतमस्तक होत असते. भारत मात्र केवळ सत्याचीच शक्ती मानतो. हिंदू समाज हा सेवाभावी आणि परोपकारी आहे. हीच त्याची खरी शक्ती आहे, असेही सरसंघचालक म्हणाले. या हिंदू संगमात दीड लाखावर साधू, संत, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक उपस्थित झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20511

Posted by on Feb 12 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, फिचर, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, फिचर, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (2072 of 2456 articles)


=हायकोर्टाचा नितीशकुमारांना झटका= पाटणा, [११ फेब्रुवारी] - बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी या आमदारांना घेऊन ...

×