Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मतदान करून पर्रीकर पायीच रेस्टॉरंटमध्ये गेले!

मतदान करून पर्रीकर पायीच रेस्टॉरंटमध्ये गेले!

=पणजीकर अवाक्=
parrikar_manohar2पणजी, [६ मार्च] – केंद्रीय मंत्री म्हटला की सुरक्षा रक्षकांचा गराडा, भला मोठा ताफा आणि नेते व कार्यकर्त्यांचा लवाजमा ओघानेच येतो. पण, साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेले देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यास नेहमीच अपवाद ठरत आले आहेत. आज रविवारच्या सकाळी तर त्यांनी धम्मालच केली. पणजी महापालिकेसाठी मतदान केल्यानंतर चहा पिण्यासाठी तिथून काही अंतरावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ते पायीच चालत गेले. खुद्द संरक्षण मंत्री साध्या माणसाप्रमाणे फिरत असल्याचे पाहून पणजीकर मात्र अवाक् झाले.
अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पर्रीकर सकाळीच मतदान केंद्रावर सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहिले. त्यांनी स्वत:साठी कुठलीही व्हीआयपी सुविधा मागितली नाही आणि स्वीकारलीही नाही. रांगेतच जाऊन मतदान केले. आजूबाजूला साध्या गणवेशातील सुरक्षा अधिकारी होते. पण, मतदान केल्यानंतर पर्रीकर नेमके काय करणार? याविषयी कुठलीही माहिती त्यांना नव्हती. पर्रीकर जवळच असलेल्या रेस्टॉरंटपर्यंत पायी चालत गेले. देशाच्या संरक्षण मंत्र्यांना पाहून रेस्टॉरंटमध्ये असलेले नागरिकही आश्‍चर्यचकित झाले. पण, पर्रीकर यांच्या साध्या राहणीमानाची माहिती असलेल्या नागरिकांनी त्यांना स्मित केले आणि आपापल्या कामाला लागले. देशाचे संरक्षण मंत्री झाल्यानंतरही पर्रीकर यांनी आपले साधे राहणीमान कायम ठेवले, ही आमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. येथील चर्चमध्ये प्रत्येक रविवारी सकाळची प्रार्थना केल्यानंतर या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्‍चन नागरिक चहा आणि नाश्त्यासाठी येत असतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27060

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (754 of 2453 articles)


=गुजरातमध्ये एनएसजीचे ४०० कमांडो तैनात, पोलिसांच्या सुट्या रद्द, कच्छमध्ये धाडसत्र= नवी दिल्ली/अहमदाबाद, [६ मार्च] - लष्कर-ए-तोयबाचे १० अतिरेकी गुजरातमध्ये घुसले ...

×