Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » मथुरेतील आजच्या रॅलीत मोदींना उडवू

मथुरेतील आजच्या रॅलीत मोदींना उडवू

=पोलिस अधीक्षकांना धमकीचे पत्र=
pm-narendra-modiलखनौ, [२४ मे] – केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाने उद्या सोमवारपासून देशभरात ‘जनकल्याण पर्व’ आयोजित केले आहे. या पर्वाची सुरुवात सोमवारी उत्तरप्रदेशातील मथुरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रॅलीने होणार असताना, याच रॅलीत मोदी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र आणि एसएमएस मथुरेच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. राकेश कुमार यांना आज रविवारी सकाळीच हे पत्र आणि एसएमएस प्राप्त झाला. मथुरेत नरेंद्र मोदी जेव्हा जाहीर सभेला संबोधित करत असताना आम्ही शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून मोदी यांना ठार मारू, असे या पत्रात आणि एसएमएसमध्ये नमूद आहे. ही धमकी नेमकी कोणत्या अतिरेकी गटाकडून मिळाली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सुरक्षा यंत्रणेला मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पत्र आणि एसएमएस कुठून आला, याचा शोध घेण्यात येत आहे.
पत्र आणि एसएमएस करणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक गठित करण्यात आले आहे. सोमवारी मथुरा येथे ज्या ठिकाणी मोदी यांची जाहीर सभा होत आहे, त्या संपूर्ण परिसराची बॉम्ब शोधक यंत्रणेच्या माध्यमातून कसून तपासणी केली जात आहे. या परिसरात पोलिस आणि सुरक्षा जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22682

Posted by on May 25 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1663 of 2453 articles)


=उमेदवारांसाठी खुशखबर...= नवी दिल्ली, [२४ मे] - केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थातच युपीएससीची परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे... या ...

×