|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.07° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 46 %

वायू वेग : 7.9 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.09°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.63°C - 30.49°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.81°C - 30.35°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.83°C - 30.75°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.27°C - 32.16°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.08°C - 32.51°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » मध्यप्रदेशात डायनासोरच्या दोन गुहा आढळल्या

मध्यप्रदेशात डायनासोरच्या दोन गुहा आढळल्या

=साडेसहा कोटी वर्षे जुनी अंडीही आढळली, संशोधकांचा दावा=
dinosaursइंदूर, [१८ सप्टेंबर] – मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात डायनोसरच्या दोन अतिशय प्राचीन गुहा संशोधकांना आढळून आल्या असून, या गुहांमध्ये डायनासोरची अंडीही सापडल्या आहेत. ही अंडी ६.५ कोटी वर्षांपूर्वीची असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
इंदूरपासून अवघ्या १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धारजवळील एका जंगलात या दोन नव्या गुहा आम्हाला आढळून आल्या. ६.५ कोटी वर्षांपूर्वी जी भौगोलिक उलथापालथ झाली होती, त्यात महाकाय दगडांखाली या गुफा गाडल्या गेल्या असाव्यात, अशी माहिती मंगल पंचायत परिषदेचे प्रमुख आणि प्रख्यात भूगर्भतज्ज्ञ विशाल वर्मा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
धार जिल्ह्यातील बागा परिसरात सापडलेल्या दोन्ही गुहा परस्परांपासून आठ किलोमीटर अंतरावर आहेत. प्रत्येक गुहेत डायनासोरची किमान १५ अंडी असावीत. तथापि, दोन्ही गुहांमध्ये नेमकी किती अंडी आहेत, याचा शोध संशोधकांकडून घेतला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
या अंड्यांचा आणि गुहेतील रचनेचा सखोल अभ्यास केल्यानंतर डायनासोरची अंडी देण्याची पद्धत कशी होती, याचा शोध लागू शकणार आहे. सोबतच, अंडी देण्यासाठी डायनासोर एकाच जागेचा वारंवार वापर करीत होते का, हेदेखील या अभ्यासातून स्पष्ट होणार आहे, असे ते म्हणाले. गेल्या एक दशकापासून माझी चमू या भागात संशोधनकार्य करीत आहे. यापूर्वीही आम्हाला डायनासोरच्या दोन गुहा सापडल्या होत्या. त्यात आता दोन नव्या गुहंची भर पडल्याने शोध लागलेल्या एकूण गुहंची संख्या चार झाली आहे. या महाकाय प्राण्याच्या सौरोपोड जातीशी संबंधित ही अंडी असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कोट्यवधी वर्षांपूर्वी मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात डायनासोरचे अस्तित्व होते. हा सुमारे १०८ हेक्टरचा परिसर असून, तो संपूर्ण परिसर विकसित करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने ठोस धोरण तयार केले आहे.

Posted by : | on : 19 Sep 2015
Filed under : ठळक बातम्या, विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g