|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.18° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 6.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.61°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

28.38°C - 30.55°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.8°C - 30.52°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.6°C - 30.29°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.11°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.54°C - 30.88°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, मराठवाडा » मनसे उमेदवाराचे ऐनवेळी शिवसेनेला समर्थन

मनसे उमेदवाराचे ऐनवेळी शिवसेनेला समर्थन

MaharashtraParbhaniपरभणी, [१४ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असतानाच, परभणी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. विनोद दुधगांवकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. सेना-मनसेतील मतविभाजनाचा फायदा ओवैसीच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराला होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे मनसे उमेदवाराने स्पष्ट केले आहे.
मनसेचे परभणीचे उमेदवार विनोद दुधगावकर शिवसेना कार्यालयात पोहोचताच सर्वजण अवाक् झाले. आपण शिवसेना उमेदवार डॉ. राहुल पाटील यांना समर्थन देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. परंतु, एमआयएमचे उमेदवार सज्जू लाला यांना रोखण्यासाठी आणि मतविभाजन टाळण्यासाठीच ही खेळी असल्याची चर्चा आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगलीच रंगली होती. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गरज भासल्यास आम्ही एकत्रही येऊ, असे सूचक विधान करून राज यांनी या चर्चेला हवा दिली होती. पण नंतर, उद्धव यांनी आपल्याला प्रतिसादच न दिल्याचा गौप्यस्फोटही राज यांनीच वैतागून केला होता.

Posted by : | on : 15 Oct 2014
Filed under : ठळक बातम्या, मराठवाडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g