Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मनोहर पर्रीकर बीजिंगमध्ये दाखल

मनोहर पर्रीकर बीजिंगमध्ये दाखल

=घुसखोरी, सीमा प्रश्‍नावर आज चर्चा=
manohar-parrikar2बीजिंग, [१७ एप्रिल] – चीनच्या दौर्‍यावर असलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज रविवारी शांघायमधून बीजिंगमध्ये दाखल झाले. चीनचे संरक्षण मंत्री जनरल चांग वॉंगून, सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष जन. फॅन चँगलॉंग आणि अन्य लष्करी अधिकार्‍यांसोबत सीमेवरून होणारी घुसखोरी आणि सीमावादावर उद्या सोमवारी ते चर्चा करणार आहेत.
सीमेवरील गस्तीच्या काळात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. द्विपक्षीय संबंधात या घटना अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने, अशा घटना रोखण्यावर मनोहर पर्रीकर विशेष भर देणार आहेत. सुमारे २३ लाख जवान असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे नेतृत्व करणार्‍या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे नेतृत्व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे आहे.
पर्रीकर चीनचे पंतप्रधान ली. केकियांग यांचीही भेट घेणार असून, त्यानंतर ते या देशाच्या वेस्टर्न कमांड लष्करी मुख्यालयालाही भेट देणार आहेत. भारताला लागून असलेली सीमा याच मुख्यालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे. पर्रीकर यांच्यासोबत या दौर्‍यात आलेल्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळात लष्कर, हवाई दल आणि नौदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27857

Posted by on Apr 18 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (483 of 2458 articles)


=पंतप्रधानांचे टीकास्त्र= कृष्णनगर, [१७ एप्रिल] - आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय ...

×