Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘मन की बात’वर बंदी नाही

‘मन की बात’वर बंदी नाही

  • निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका
  • कॉंगे्रस, जदयु, राजद तोंडघशी

modi man-ki-baatनवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर बंदी घालण्यास निवडणूक आयोगाने आज बुधवारी स्पष्टपणे नकार दिला. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते, असे कारण पुढे करून कॉंगे्रस, जदयु आणि राजद या राजकीय पक्षांनी कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी आयोगाकडे केली होती.
आम्ही अशा कोणत्याही मागणीची दखल घेऊन, तत्काळ कारवाई करू शकत नाही. या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचे उल्लंघन खरोखरच होत आहे का, याचा विचार आम्ही करणार आहोत, असे आयोगातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठक आणि पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम डोळे मिटून कारवाई करण्यासारखा नक्कीच नाही. तथापि, मंत्रिमंडळ बैठकीत जर निवडणूक होत असलेल्या राज्याच्या हिताचा निर्णय घेण्यात आला असेल, तर त्या निर्णयावर आम्ही तेवढ्या काळापुरती बंदी घालू शकतो, असेही अधिकार्‍याने सांगितले.
तत्पूर्वी, बुधवारी सकाळी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन कॉंगे्रस, जदयु व राजदने कार्यक्रमावरच बंदी घालण्याची मागणी केली होती. या पक्षांच्या नेत्यांनी आयोगातील अधिकार्‍यांची दुपारी अडीच वाजता भेट घेतली आणि आपल्या मागणीचे निवेदन सादर केले होते. देशभरात रेडिओवरून प्रसारित होणार्‍या ‘मन की बात’ मधून पंतप्रधान त्यांच्या पक्षाची गौरवास्पद कामगिरी सांगू शकतात, त्यांच्या आश्‍वासनांमुळे मतदार प्रभावित होऊ शकतो, असा दावाही कॉंग्रेसने केला होता. विशेष म्हणजे, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या काळातही कॉंगे्रसने हाच आरोप केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23840

Posted by on Sep 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1463 of 2453 articles)


=रामदेव बाबा यांची मागणी= जोधपूर, [१६ सप्टेंबर] - हिंदू धर्मात गाय ही मातेसारखीच असल्याने तिला राष्ट्रीय पशू जाहीर करण्यात यावे, ...

×