Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » मल्ल्यांनी दिला राज्यसभेचा राजीनामा

मल्ल्यांनी दिला राज्यसभेचा राजीनामा

Vijay Mallyaनवी दिल्ली, [२ मे] – सार्वजनिक बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकित असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभेच्या नीतिमत्ता समितीला उद्या मंगळवारपर्यंत उत्तर देण्यापूर्वीच मल्ल्यांनी राजीनामा दिला, हे विशेष!
मल्ल्या यांनी राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला असून, नीतिमत्ता समितीलाही याची माहिती दिली आहे. मात्र, राजीनाम्याच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मल्ल्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार होता.
विजय मल्ल्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी शिफारस नीतिमत्ता समितीने २५ एप्रिल रोजी एकमताने केली होती आणि मल्ल्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली होती. मल्ल्यांच्या सदस्यत्वाबाबत निर्णय घेण्यासाठी नीतीमत्ता समितीची उद्या मंगळवारी बैठक होणार आहे.
मल्ल्या कर्नाटकातून अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून आले होते आणि सध्या ९ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज त्यांच्यावर थकित आहे. अवैध सावकारीच्या प्रकरणात विशेष न्यायालय आणि अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) तीन वेळा हजर राहाण्यात अपयश आल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. विशेष न्यायालयाने मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केला आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय!

Short URL: https://vrittabharati.in/?p=28125

Posted by on May 3 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (396 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ मे] - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेला ‘नीट’ चा पहिला टप्पा रविवारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर या परीक्षेबाबत आठ राज्यांनी ...

×