Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मल्ल्यांनी संपत्ती जाहीर करावी: सुप्रीम कोर्टाचा आदेश

मल्ल्यांनी संपत्ती जाहीर करावी: सुप्रीम कोर्टाचा आदेश

supreme_court_1नवी दिल्ली, [७ एप्रिल] – किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज गुरूवारी दिले आहे. मल्ल्या यांनी पत्नी व मुलाच्या मालमत्तेचे विवरण कोर्टासमोर सादर करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांना दिले आहे.
विजय मल्ल्या यांनी १७ बँकांकडून घेतलेले ९००० हजार कोटी रूपयांच्या कर्जापैकी ४ हजार कोटी रूपयांच्या कर्जफेडीचा प्रस्ताव बँकांपुढे ठेवला होता. मात्र आजच्या सुनावणीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव बँक समुहाने नाकारला आहे. मल्ल्या यांनी जरी हा प्रस्ताव दिला असला तरी ते प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी सुरूवातीला काही रक्कम कोर्टात जमा करण्याची आवश्यकता आहे, असेही बँकांचे म्हणणे आहे.
मल्ल्या यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीसह स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या संपत्तीचा खरा तपशील जाहीर करावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. याशिवाय मल्ल्या भारतात कधी येणार आहे, याबाबतची माहिती देण्याचेही आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27744

Posted by on Apr 7 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (515 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ एप्रिल] - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक भारतरत्न पंडीत रविशंकर यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ ने ‘डुडल’ च्या माध्यमातून ...

×