Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मशीद धार्मिक स्थळ नाही: सुब्रमण्यम स्वामी

मशीद धार्मिक स्थळ नाही: सुब्रमण्यम स्वामी

SUBRAMANIAN_SWAMYनवी दिल्ली, [१५ मार्च] – मशीद हे धार्मिक स्थळ नसून फक्त एक इमारत आहे आणि त्यामुळे ती कधीही तोडता येऊ शकते, असे मत भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले असून, यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. स्वामी यांच्या या विधानावरून गुवाहाटी येथे त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मुस्लिम ज्या कोणत्या देशात गेले त्या देशाला त्यांनी १०० टक्के मुस्लिम राष्ट्र बनविले. इराकला १७ वर्षांमध्ये १०० टक्के मुस्लिम देश बनविले. परंतु, भारतात ८०० वर्षे मुस्लिमांचे आणि २०० वर्षे ख्रिश्‍चनांचे राज्य असूनही ८० टक्के हिंदू आहे, असे डॉ. स्वामी यांनी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. कोणतेही मंदिर हे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर बनविले जाते. त्यानंतर त्या मूर्तीमध्ये भगवंत वास करतात आणि ते त्याचे स्वामी होतात, अशी मान्यता आहे. न्यायालयानेही ही बाब मान्य केली आहे. पूजा झाली किंवा नाही तरी मंदिर हे मंदिरच असते. परंतु, मशीद मुस्लिम धर्माचा आवश्यक हिस्सा नाही, असेही डॉ. स्वामी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21472

Posted by on Mar 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1906 of 2453 articles)


मुंबई , [१५ मार्च] - राज्य पोलिस दलात १२,११५ पदे रिक्त असल्याची माहिती, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारलेल्य प्रश्‍नाला ...

×