Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » मसरत आलमला अखेर अटक, देशद्रोहाचा गुन्हा

मसरत आलमला अखेर अटक, देशद्रोहाचा गुन्हा

masrat_alam_kashmirनवी दिल्ली, [१७ एप्रिल] – श्रीनगरमध्ये रॅली काढून पाकिस्तानचा झेंडा फडकावून भारताविरोधात घोषणाबाजी करणार्‍या फुटीरवादी नेता मसरत आलम याला अखेर आज शुक्रवारी सकाळी त्याच्या श्रीनगर येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. मसरत आलमला अटक केल्यानंतर हुमहामा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. आलमविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व फुटीरवादी नेते आज शुक्रवारी पुलवामा जिल्हयातील त्रालमध्ये सभा घेणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सभेची परवानगी रद्द करून ही कारवाई केली.
हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या श्रीनगर आगमनानंतरच्या सभेत मसरत आलमने काश्मीर पाकिस्तानाला देऊन टाकावं यासाठी जोरदार घोषणाबाजी केली होती. ‘‘ मेरी जान, मेरी जान, पाकिस्तान पाकिस्तान’’, अशी घोषणाबाजी मसरतने केली होती. मसरत आलमनं भारतविरोधी घोषणा देऊन नागरिकांना भडकविण्याचा प्रयत्न केला होता. या त्याच्या कृत्यानंतर काल गुरुवारी देशात मसरत विरोधी निदर्शनं सुरु झाली.
मसरतसह हुरियत नेत्यांनी निदर्शने करताना पाकचा झेंडा फडकविल्यानंतर केंद्राने सईद सरकारला तंबी दिली. त्यानंतर सईद सरकारने मसरत आलम, गिलानी, मीरवाइज फारूक आणि इतर फुटीरवाद्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र हुरियत कॉन्फरन्सने या कारवाईला विरोध केला आणि पक्ष या कारवाईला घाबरला नाही, अशी टिप्पणी केली. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री सईद यांना या फुटीरवाद्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22159

Posted by on Apr 18 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1772 of 2452 articles)


=भाचा अभिजित रॉय यांचा दावा= कोलकाता, [१७ एप्रिल] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय बेपत्ता होण्यामागील कारणाचा शोध घेण्यात येत ...

×