Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मसूद अझरचा बचाव का केला?

मसूद अझरचा बचाव का केला?

  • चीनच्या दुटप्पी धोरणावर स्वराज संतापल्या
  • दहशतवादाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील

Sushma-Swaraj2मॉस्को, [१८ एप्रिल] – पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आडकाठी का आणली? दहशतवादाच्या मुद्यावर तुम्ही जे दुटप्पी धोरण अवलंबले आहे, त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगालाच भोगावे लागणार आहेत, अशा परखड शब्दात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी चीनला फटकारले.
रशिया-भारत-चीन या तीन देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झालेल्या सुषमा स्वराज यांनी जगाला दहशतवादमुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुहाने एकत्र येण्याची आणि संयुक्त प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद केले. याचवेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तार व सुधाराचा मुद्दाही उपस्थित केला. भारताने या दिशेने घेतलेल्या पुढाकाराला रशिया आणि चीनने समर्थन देण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
पठाणकोट हल्ला मसूदनेच घडविला, याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते पाकिस्तानला सादरही केले आहेत. त्यामुळे त्याचे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या यादीत समाविष्ट करणे आवश्यक होते. भारताने या दिशेने पावलेही उचलली होती. पण, तुम्ही (चीन) त्यात गुप्त नकाराधिकार वापरून केवळ मसूदचाच नव्हे, तर दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानचाही बचाव केला आहे, असे सुषमा स्वराज यांनी चीनचे विदेश मंत्री वॉंग यी यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले.
वॉंग यांनी मात्र स्वराज यांच्या प्रश्‍नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मसूदबाबत जाब विचारल्यानंतर सुषमा स्वराज यांनी त्यांच्यासोबत भारत-चीन द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्दे, सीमा प्रश्‍न आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही सखोल चर्चा केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27891

Posted by on Apr 19 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (471 of 2458 articles)


=बेरोजगार तरुणांसाठी अच्छे दिन= नवी दिल्ली, [१८ एप्रिल] - देशातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी असून, लवकरच त्यांच्या जीवनात अच्छे दिन ...

×