Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » महाकार्यकर्ता संमेलनाला अमित शहा संबोधित करणार

महाकार्यकर्ता संमेलनाला अमित शहा संबोधित करणार

AmitShah-Varanasiजयपूर, [२२ एप्रिल] – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २५ एप्रिल रोजी आपल्या राजस्थान दौर्‍यात महाकार्यकर्ता संमेलनाला संबोधित करणार आहेत.
भाजपाचे २५ हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. मान्यवर भाजपा नेते आणि जिल्हा व तालुका पातळीवरील निर्वाचित सदस्य या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांनी दिली. सम्मेलनाकरीता राज्याच्या राजधानीत अमरोदोेन बाग येथे विशेष ऑडिटोरियम बांधण्यात आले आहे. राजस्थान दौर्‍यात अमित शहा राज्यातील आमदार, खासदार आणि मान्यवरांचीही भेट घेणार आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या देखील अमित शहा यांची भेट घेणार आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर अमित शहा यांनी विविध राज्यांना भेट दिली असली, तरी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच राजस्थान दौरा आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22233

Posted by on Apr 23 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1757 of 2453 articles)


=ताशी ६०३ किमी वेगाने धावली रेल्वे= टोकियो, [२२ एप्रिल] - अतिशय जलद गतीने धावणार्‍या रेल्वेगाड्या आणि बुलेट ट्रेन विकसित करण्यात ...

×