Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महात्मा फुलेंचे वंशज संघमय

महात्मा फुलेंचे वंशज संघमय

महात्मा फुलेंचे वंशज संघमय
mahatma-phule-vanshaj in rssमुंबई, [११ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही समाजात समरसता व चारित्र्य निर्माण करणारी शिस्तबद्ध संघटना असून, या संघटनेत जातिपातीला मुळीच थारा नाही, असे सुस्पष्ट प्रतिपादन बहुजन समाजाचे आद्य नेते, समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे वंशज नितीन फुले यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याजवळील मारुंजी येथे झालेल्या शिवशक्ती संगम या विराट कार्यक्रमात नितीन फुले, त्यांचा २१ वर्षाचा मुलगा रितेश आणि चुलत बंधू दत्तात्रय पितांबर फुले हे तिघे जोतिबांचे वंशज सहभागी झाले होते. नितीन फुले हे महात्मा फुलेंचे थोरले बंधू राजाराम फुले यांचे वंशज आहेत.
संघाचा विचार हा समता शिकविणारा असून, संघातील शिस्तबद्ध कार्यक्रम आणि उपक्रमांनी आपल्याला आकर्षित केले, असे रितेश फुले यांनी सांगितले.
फुले कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले नितीन फुले संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाशी कसा संबंध आला याविषयी बोलताना नितीन म्हणतात, आमच्या घराजवळ संघाची शाखा भरायची व तिचे नाव महात्मा फुले सायम् शाखा असे होते. बालपणापासून मी त्या शाखेमध्ये जात आहे. संघात खर्‍या अर्थाने समरसता, बंधुता शिकवली जाते आणि संघाच्या दैनंदिन शाखेमधून नैतिक मूल्ये आपल्यामध्ये रुजल्याचे त्यांनी सांगितले.
आता त्यांचा मुलगा रितेश, संघाच्या तालमीमध्ये तयार होत आहे. शिवशक्ती संगम कार्यक्रमामुळे रितेशची संघाबद्दलची ओढ अधिकच वाढली आहे. त्याने या कार्यक्रमासाठी संपूर्ण गणवेश विकत घेतला होता, असे नितीन यांनी सांगितले. यापूर्वी १९८३ मध्ये पुण्यात तळजाई टेकडीवर संघाचे भव्य शिबिर झाले होते. त्याला ते उपस्थित राहू शकले नव्हते. भाऊ दत्तात्रेय आणि मुलगा रितेश शिवशक्ती संगमामध्ये सहभागी झाल्याचा नितीन यांना अभिमान आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26469

Posted by on Jan 12 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (925 of 2451 articles)


=दहशतवाद्यांनी फेकले सोशल नेटवर्किंगवर जाळे= नवी दिल्ली, [९ जानेवारी] - दहशतवाद्यांनी ‘नौ दो ग्यारह’ नावाने व्हॉटस्‌अप ग्रुप बनवला असून आता ...

×