Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी ७२१० कोटी

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी ७२१० कोटी

=प्रकल्पांच्या कामांना गती येणार : गिरीश महाजन=
girish mahajanनवी दिल्ली, [६ मार्च] – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतर्ंगत राज्यातील सिंचन प्रकल्पांना वेगाने निधी मिळणार असल्यामुळे राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता गती येईल, असा विश्‍वास राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात गठित समितीच्या श्रमशक्ती भवनात झालेल्या बैठकीनंतर महाजन बोलत होते. छत्तीसगडचे पाटबंधारे मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गिरीश महाजन, तेलंगणाचे पाटबंधारे मंत्री टी. हरीश राव आणि केंद्रीय जलसंधारण सचिव डॉ. अमरजितसिंह उपस्थित होते. राजस्थान, आसाम, आणि जम्मू-काश्मीरचे सचिवही यावेळी उपस्थित होते.
देशातील कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी गतवर्षी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली होती. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने या योजनेला गती देण्यासाठी विविध राज्यांच्या जलसंसाधन मंत्र्यांची एक समिती नेमली होती. या समितीच्या बैठकीत योजनेच्या मार्गदर्शक तत्वांबाबत तसेच राज्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. राज्यातील पूर्ण होणार्‍या प्रकल्पांसाठी जलसंधारण मंत्रालयाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. या निधीत केंद्र आणि राज्य यांचा वाटा ६०:४० ठेवण्याची मागणी करण्यात आली. दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त राज्यांना अतिरिक्त निधी देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
या योजनेतर्ंगत देशात एकूण ४६ सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. यातील २३ सिंचन प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले, तर उर्वरित प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील ७ प्रकल्पांचा समावेश असून, वेगवर्धित सिंचन प्रकल्प आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतर्ंगत महाराष्ट्रातील प्रकल्पांना ७२१०.६२ कोटी रुपये मिळणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ७ प्रकल्प
या योजनेतर्ंगत महाराष्ट्रातील ७ प्रकल्पांची निवड झाली आहे, त्यात भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीवरील बावनथडी सिंचन प्रकल्प, वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा सिंचन प्रकल्प, परभणी आणि जालना जिल्ह्यातील नदीवरील दुधना नदीवरील लोअर दुधना सिंचन प्रकल्प, कोल्हापूर जिल्ह्याच्या चांदगड येथील तिल्लारी नदीवरील तिल्लारी सिंचन प्रकल्प, धुळे जिल्ह्याच्या पांझरा नदीवरील लोअर पांधरा सिंचन प्रकल्प तसेच अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्‍वर सिंचन प्रकल्पांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27070

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (749 of 2451 articles)


नवी दिल्ली, [६ मार्च] - येत्या आर्थिक वर्षापासून राज्यातील बचत गटांना बिनव्याजी कर्ज दिले, अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बालविकास ...

×