Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महाराष्ट्रातील ३ भाषातज्ज्ञ राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

महाराष्ट्रातील ३ भाषातज्ज्ञ राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

pranab-mukherjee3नवी दिल्ली, [१२ मार्च] – महाराष्ट्रातील तीन भाषातज्ज्ञांचा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मानव संसाधन मंत्रालयातर्फे आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पं. श्रीकृष्णशास्त्री काशीनाथशास्त्री जोशी (कोंडणीकर), डॉ. प्रसाद प्रकाश जोशी आणि डॉ. धम्मदीप पंढरी वानखेडे या तीन भाषातज्ज्ञांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सातार्‍याचे पं. श्रीकृष्णशास्त्री जोशी यांना संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पं. जोशी यांनी न्यायशास्त्र, काव्य, वेदांतसार आणि ऋग्वेदाचा अभ्यास केला. कर्नाटकच्या संकेश्‍वर पीठातून त्यांनी न्यायरत्न, पुराणशास्त्र कोविदची पदवी घेतली. ४५ वर्षांपासून सातार्‍यातील शंकराचार्य वेदशास्त्र शाळेत ते अध्ययनाचे काम करीत आहेत. पुराण प्रवचन, रामायण, देवीपुराण आणि भागवत कथा वाचनाचे कार्यक्रम ते विविध ठिकाणी घेत असतात.
डॉ. प्रसाद जोशी यांनी पुण्यातील भारतीय विद्या भवनमधून संस्कृत भाषा कोविद पदवी, वैदिक व्याकरणात विद्यावारिधी, पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेतून संस्कृत चुडामणी पदवी आणि पुणे विद्यापीठातून भाषाशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी काही काळ संस्कृतचे विभागप्रमुख म्हणून काम केले. डॉ. जोशी यांचे १७ शोधनिबंध आणि १० आलेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते डेक्कन कॉलेज विद्यापीठातील संस्कृत शब्दकोष समितीशी जुळलेले आहेत.
डॉ. धम्मदीप पंढरी वानखेडे हे पाली भाषेतील तज्ज्ञ आहेत. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पाली भाषेत एमए केले. नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच. डी केली. गुलबर्गा विद्यापीठाच्या कलबुर्गी येथील पाली व बौद्ध अध्ययन संस्थेत अतिथी प्रध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. वानखेडे यांनी ‘बौद्ध तर्कशास्त्राची रुपरेषा’ हे पुस्तक मराठीत, तर ‘विश्‍व क्षितीज पर बौद्धधर्म’ हे पुस्तक हिंदी भाषेत लिहिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27258

Posted by on Mar 13 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (682 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१२ मार्च] - जर कंपनीमध्ये दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असतील, तर त्यांनाही भविष्यनिर्वाह निधी लागू करण्याचा ...

×