Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » महाराष्ट्रात स्त्रियांबाबतच्या गुन्ह्यात वाढ

महाराष्ट्रात स्त्रियांबाबतच्या गुन्ह्यात वाढ

=राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट=
नाशिक, [२ जुलै] – महाराष्ट्र हे स्त्रियांसाठी सुरक्षित राज्य असल्याची बिरुदावली मिरवणार्‍या नेत्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीनंतर चांगलीच चपराक बसली आहे. २०१२ च्या तुलनेत २०१३ साली महाराष्ट्रात स्त्रियांच्या बाबतीत घडणार्‍या गुन्ह्यांमध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात गणल्या जाणार्‍या नाशिक शहरात २०१२ च्या तुलनेत २०१३ साली स्त्रियांच्या बाबतीत घडणार्‍या गुन्ह्यांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२०१३ साली नाशिकमध्ये बलात्कार पीडितांच्या संख्येत वाढ झालेली नाही. मात्र घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हुंडाबळींच्या संख्येतदेखील वाढ झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
नाशिकशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबई, औरंगाबाद आणि उपराजधानी नागपूर शहरातदेखील स्त्रियांबाबतीत घडणार्‍या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रातील एकूण स्त्रियांची संख्या ५.५४ कोटी एवढी आहे.
नाशिकचे पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सारंगल यांनी सांगितले की, ‘यापूर्वी अनेक घटनांची थेट गुन्हा म्हणून नोंद करण्यात येत नव्हती. मात्र, कायद्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांची आता नोंद होते. याशिवाय महिलांमध्ये जागरूकता देखील वाढत आहे. संकटात असलेल्या महिलांना अधिक तत्परतेने मदत पुरवण्यासाठी आम्ही काही योजना आखत आहोत’, असे त्यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात आम्ही ‘निर्भया मोबाईल स्कॉड’ स्थापन केली आहे. त्यात एक सशस्त्र महिला पोलिस अधिकारी आणि एक महिला कॉन्स्टेबल शहरात गस्त घालणार आहेत. तसेच संकटात सापडलेल्या महिलेला ते मदत पुरवणार आहेत. तसेच खास महिलांसाठी आम्ही पोलिस नियंत्रण कक्षात एक विशेष क्रमांक जारी केला आहे’, असेही त्यांनी सांगितले.
महिला अत्याचार समितीच्या दीपाली मानकर यांनी सांगितले की, महिलांना सक्षम बनविणारे कायदे आपल्याकडे आहेत. मात्र लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजाच्या भीतीने अद्यापही काही गुन्ह्यांची नोंद केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13904

Posted by on Jul 3 2014. Filed under उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या (2400 of 2451 articles)


रियो दी जानेरियो, [२ जुलै] - संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमींना वेड लावणारी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच ...

×