Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाराष्ट्राला कृषी पंपांसाठी अर्थसहाय्य देऊ : गोयल

महाराष्ट्राला कृषी पंपांसाठी अर्थसहाय्य देऊ : गोयल

piyush goyal_0मुंबई, [२५ जून] – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सोलर वीजपुरवठा तसेच विजेची मोठ्या प्रमाणात बचत करणारे एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने सादर करावा, असे केंद्रीय उर्जा, कोळसा तसेच अपारंपरिक ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. प्रत्येक शेतकर्‍याला सोलर वीज पुरवठा, ठिबक सिंचन व विजेची बचत करणारा पंप अशा पद्धतीचा आराखडा तयार करून दिल्यास तो एक आदर्श नमुना ठरू शकेल. महाराष्ट्राने यासाठी पुढाकार घेऊन कार्यवाही करावी. यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील ऊर्जाविषयक विविध प्रश्‍नांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या ऊर्जा, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पीयूष गोयल पुढे म्हणाले, केंद्र शासनाने विजेची बचत करू शकणार्‍या कृषी पंपाच्या उपलब्धतेसाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. यात स्मार्टमीटर, फ्लोमीटर सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विजेबरोबरच वेळेचा आणि पाण्याचाही अपव्यय टाळणे शक्य होणार आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत राज्यांना कर्जतत्त्वावर अर्थपुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्रानेही या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकर्‍याला सोलर वीजपुरवठा, ठिबक सिंचन व विजेची बचत करणारा पंप उपलब्ध होईल, अशा पद्धतीचा आराखडा तयार करून तो राज्यभर राबवावा. त्यामुळे शेतकर्‍याचा विजेसाठी होणारा मोठा खर्च वाचून त्याला दिलासा मिळेल. शिवाय यातून पाण्याचीही मोठी बचत झाल्याने त्याचेही लाभ मिळतील. या योजनेसाठी केंद्र शासनामार्फत महाराष्ट्राला तातडीने भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी क्षेत्रातील विजेचा वापर हा सोलर आधारित करण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. फिडर सेपरेशनसारख्या उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. यासंदर्भात देशभरात राबविता येऊ शकेल असा एक पथदर्शीप्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा. कृषी तसेच ग्रामीण वीजपुरवठा अधिक सुनिश्‍चित करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचा अतिरिक्त सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्यास तातडीने मान्यता देण्यात यावी, अशी विनंती याप्रसंगी फडणवीस यांनी गोयल यांना केली. कृषीसाठी विजेची बचत करणारे एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्याची योजना राज्यात निश्‍चितपणे राबविली जाईल. यासाठी ऊर्जा, वित्त आणि कृषी विभागातील अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी एकत्रित बसून सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रास तातडीने सादर करावा, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. राज्यातील प्रत्येक शेतकर्‍याला सोलर आधारित एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून घेऊन ही योजना प्रभावीपणे राबवू, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत राज्यात सुरू असलेले विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्प, त्यासाठी कोळसा पुरवठ्यात येणार्‍या अडीअडचणी यासंदर्भातही चर्चा झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांची एक बैठक घेऊन या अडचणी तातडीने दूर करू, अशी ग्वाही याप्रसंगी गोयल यांनी दिली. महाराष्ट्रात मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत नवीन उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्यांना विजेचा स्वस्त आणि शाश्‍वत पुरवठा उपलब्ध करून दिल्यास राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच महसुलातही भरीव वाढ होईल.
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांच्या परिसरात एमआयडीसीचा विकास करण्यासंदर्भातही विचार होऊ शकतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28806

Posted by on Jun 26 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (175 of 2451 articles)


=हाफिझ सईदची दर्पोक्ती= लाहोर, [२५ जून] - पाकिस्तानी नद्या मुक्त करण्यासाठी भारताताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे, अशी दर्पोक्ती लष्कर-ए-तोयबा या ...

×