Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महाराष्ट्रासह सहा राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट

महाराष्ट्रासह सहा राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट

=बुधवार ठरला यंदाच्या मोसमातील सर्वांत उष्ण दिवस=
tempture meterनवी दिल्ली, [१८ मे] – भारतीय वेधशाळेने महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट आज बुधवारी जारी केला. आजचा दिवस यंदाच्या मोसमातील सर्वाधिक उष्ण ठरला असून, विदर्भातील अकोल्यात ४७.१ इतक्या यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आगामी चार ते पाच दिवसांमध्ये तापमान नव्या उच्चांकावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही वेधशाळेने दिला आहे. महाराष्ट्रासोबतच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि तेलंगणात या राज्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला. तेलंगणात उष्णतेमुळे आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. विदर्भ आणि महाराष्ट्रासह संपूर्ण उत्तर भारत उष्णतेच्या लाटेत होरपळून निघाला आहे. नागपुरातही बुधवारी उष्माघातामुळे तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
राजधानी दिल्लीच्या पालम भागात आज ४६.४, अहमदाबादेत ४७ आणि कांडला शहरात ४८.४ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांच्या काळातील उष्णतेचा हा उच्चांक ठरला आहे. त्याचप्रमाणे, राजस्थानच्या बाडमेर येथे ४७.५ आणि जैसलमेर येथे ४७ अंश तापमान नोंदविण्यात आले. अकोल्यात ४७.१ अंश तापमान होते. तसेच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही ४५ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील बहुतांश शहरांमध्येही उष्णतेचा कहर दिसून आला.
आणखी पाच दिवस उष्णतेचे
आगामी चार ते पाच दिवस उष्णतेचा कहर असाच कायम राहणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. उष्णतेत आणखी वाढ होणार असल्याने उपरोक्त सहा राज्यांतील तापमान ४७ पेक्षा जास्तही जाऊ शकते, असा इशाराही दिला आहे.
अकोल्यात शेतकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू
आज अकोल्याचे तापमान ४७.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. वाढते तापमान पाहता अनेकांनी घरात राहणे पसंत केले. तिथेच, उष्माघाताने भांबेरी येथील गणेश खंडागळे या ५३ वर्षीय शेतकर्‍याचे मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28309

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (327 of 2453 articles)


=केंद्र सरकार जारी करणार अध्यादेश= नवी दिल्ली, [१८ मे] - एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश ...

×