Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाराष्ट्र बालगुन्हेगारीत दुसर्‍या क्रमांकावर

महाराष्ट्र बालगुन्हेगारीत दुसर्‍या क्रमांकावर

bal gunhegariपुणे, [७ ऑक्टोबर] – देशात बालगुन्हेगारीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यात मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात देशांत बालगुन्हेगारांना गंभीर गुन्हाच्या प्रकारात सर्वाधिक अटक करण्यात आली आहे. यात या बालगुन्हेगारांना बलात्काराच्या गुन्ह्यांत पकडण्यात आले आहे.
देशातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा २०१४’ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालावरून गेल्या काही वर्षात बालगुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यात बालगुन्हेगारांवर दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये बलात्काराचे गुन्हे सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
देशात २०१२ मध्ये २७ हजार ९३६ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन ३३ हजार ५२६ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी बालगुन्हेगारांवर चोरीचे सर्वाधिक ६०८८ गुन्हे दाखल असून महाराष्ट्रातील १२१६ बालगुन्हेगारांचा समावेश आहे. त्यानंतर खून, खुनाचा प्रयत्न करणे यासारख्या गुन्हृयांचा क्रमांक लागतो. एकूण गुन्हेगारीत बालगुन्हेगाराचे प्रमाण दीड टक्के असल्याचे समोर आले आहे. देशात बालगुन्हेगारांमध्ये सर्वात समोर मध्यप्रदेश आहे, त्यानंतर इुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. तिसर्‍या क्रमांकावर बिहार असून उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25002

Posted by on Oct 7 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1369 of 2451 articles)


नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या दोन्ही मुलांना निवडणूक रिंगणात उतरवत ...

×