Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाराष्ट्र सदन घोटाळा; छगन भुजबळांना अटक

महाराष्ट्र सदन घोटाळा; छगन भुजबळांना अटक

Chagan-Bhujbal2मुंबई, [१४ मार्च] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सोमवारी रात्री राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांना अटक केली.
सकाळपासूनच भुजबळ यांची ईडीकडून कसून चौकशी सुरू होती. तब्बल अकरा तास चौकशी केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास भुजबळ यांना अटक करण्यात आली.
याच प्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटकही झाली आहे. ते सध्या कडेकोट सुरक्षा असलेल्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीच्या एका पथकाने गेल्या महिन्यात भुजबळ यांचे पुत्र पंकज यांचीही कसून चौकशी केली होती. तथापि, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भुजबळ दक्षिण मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाढ हेदेखील होते. तर, कार्यालयाच्या बाहेर भुजबळ यांच्या शेकडो समर्थकांनी गर्दी केली होती. यामुळे कुठलीही अनुचित घटना घडायला नको, यासाठी या परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. सकाळपासून भुजबळ हे ईडीच्याच कार्यालयात होते.
ईडीने आधीच छगन भुजबळ, त्यांच्या परिवारातील काही सदस्य आणि त्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, सर्वांच्या व्यवहाराचा तपास सध्या सुरू आहे. याच गुन्ह्यात ईडीने भुजबळ यांना समन्स जारी करून, सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते.
महाराष्ट्र सदन बांधकामाच्या कंत्राटात अफरातफर करण्यासोबतच, मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हाऊसिंग प्रकल्प यासारख्या नऊ विविध प्रकल्पांचे कंत्राट आपल्या जवळच्या नातेवाईकांना देऊन सुमारे ८७० कोटींचा घोटाळा या सर्वांनी मिळून केल्याचा ईडीचा आरोप आहे.
कारवाईचा सर्वशक्तिनिशी विरोध करू : जयंत पाटील
भुजबळ यांच्याविरोधात चुकीची आणि सूडबुद्धीने कारवाई झाली, असे लक्षात आल्यास संपूर्ण पक्ष त्याचा विरोध करेल, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27324

Posted by on Mar 15 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (656 of 2451 articles)


=भाजपाची बंदची हाक= बंगळुरू, [१४ मार्च] - विश्‍व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता राजू याची रविवारी म्हैसूर येथे हत्या करण्यात आली. राजू ...

×