Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाराष्ट्र सरकारचा स्मार्ट व्हिलेजचा संकल्प

महाराष्ट्र सरकारचा स्मार्ट व्हिलेजचा संकल्प

=मेळघाटातील हरिसाल गावाला मिळणार पहिला मान=
FADNAVIS_DEVENDRA1मुंबई, [७ एप्रिल] – राज्यातील दहा शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणार आहोतच पण त्याचसोबत ‘स्मार्ट व्हिलेज’ विससित करण्यावरही राज्य शासन भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
ओरॅकल कंपनीच्या वतीने मुंबईत आयोजित ओरॅकल क्लाऊड कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम उपस्थित होते. स्मार्टसिटीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्टसिटीच्या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा प्रयत्न राहणार असून माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरे ‘स्मार्ट’ आणि ‘बेस्ट’ करण्यात येणार आहेत. शहरे ‘स्मार्ट’ बनवतानाच राज्यातील गावांचाही विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील गावा-गावांत विकासाची गंगा पोहोचविणे गरजेचे असून ‘स्मार्ट सिटी’बरोबरच ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. विकासाची गंगा गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. राज्यातील शहरांचा आणि गावांचा विकास करीत ‘डिजिटल इंडिया’ बनविण्याचे स्वप्न साकार केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना सर्वोत्तम असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात १० स्मार्ट सिटींपैकी २ स्मार्ट सिटी केंद्र शासनाच्या सहभागातून साकारणार आहेत. नवी मुंबईमध्ये ‘सिडको’च्या माध्यमातून अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून हे शहर राज्यातील पहिले स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. मेळघाटातील ‘हरिसाल’ हे गाव पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनणार असून या गावामध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रोजगाराच्या संधीत वाढ करणे, आरोग्यमान उंचावणे, पायाभूत सुविधांचा विकास, दळण-वळणाच्या सुविधा ‘स्मार्ट व्हिलेज’च्या माध्यमातून गावांना देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘आपले सरकार’ या वेबपोर्टलविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना एका क्लिकवर सर्व सेवांची माहिती मिळत असून तक्रार करण्यासाठी आता कोणालाही कार्यालयामध्ये चकरा मारण्याची आवश्यकता नाही. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत सुमारे १३ लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून जवळपास ९९ टक्के तक्रारींची सोडवणूक शासनामार्फत करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ओरॅकल उद्योग समूहाचे अध्यक्ष थॉमस कुरियन यांनी, आपली कंपनी राज्यातील ग्रामीण भागामध्ये आरोग्य विषयक, पायाभूत तसेच इतर सोयी सुविधा पुरविण्यास उत्सुक आहे. लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27758

Posted by on Apr 8 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (508 of 2451 articles)


=नरेंद्र मोदी यांचा घणाघात= सिलीगुडी, [७ एप्रिल] - पश्‍चिम बंगालमधील अलीपूर जिल्ह्यात गुरुवारी आयोजित निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×