Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणणार

महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणणार

=महिला दिनी पंतप्रधानांचा निर्धार, मोबाईल हेल्पलाईन स्थापन करणार=
narendra-modi-budgetनवी दिल्ली, [८ मार्च] – महिलांवर होणारे अत्याचार निंदनीयच आहेत. महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा मिळावी यासाठी मोबाईल हेल्पलाईन लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केले.
अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी मोबाईल हेल्पलाईनसोबतच तिला तातडीने मदत मिळावी यासाठी विशेष केंद्राची स्थापना करण्यात येईल, असे पंतप्रधानांनी महिला दिनाच्या संदेशात म्हटले आहे.
‘‘महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहिल्यानंतर मान लाजेने खाली जाते. त्यांच्यावर होत असलेला सर्वच प्रकारचा अत्याचार संपुष्टात आणण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. विकास पथावरील या प्रवासात महिलांना सामावून घेऊन त्यांना समान आणि सन्मानाचे स्थान देण्याच्या आमच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करायला हवा. महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माझ्या सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. हिंसाचार व इतर स्वरूपाच्या अत्याचाराचा सामना करीत असलेल्या महिलांना कायदेशीर सल्ला व मानसिक समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार विशेष केंद्रे स्थापन करीत आहे. सोबतच, महिलांसाठी १८१ हा क्रमांक असलेली विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे,’’ असे मोदी यांनी या संदेशात म्हटले आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या नुकत्याच संसदेत मांडण्यात आल्या आहेत. याशिवाय, अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या अनेक योजनांमुळेही महिलांना मोठी मदत मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21204

Posted by on Mar 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1951 of 2453 articles)


=केंद्राने मागितले विधि मंत्रालयाचे मत= नवी दिल्ली, [८ मार्च] - काही राज्यांनी स्वत:चा गोहत्या बंदी कायदा तयार केला आहे. देशातील ...

×