Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महिलांना घर व कामाच्या ठिकाणी मनमोकळे राहू द्या

महिलांना घर व कामाच्या ठिकाणी मनमोकळे राहू द्या

=राष्ट्रपतींचे मत, १५ महिला, सात संस्थांना नारी शक्ती पुरस्कार=
pranab-mukherjee3नवी दिल्ली, [८ मार्च] – महिलांची मानसिकता सक्षम असायलाच हवी, असे नमूद करताना घरात आणि नोकरीच्या ठिकाणी महिलांना त्यांच्या इच्छेनुसार काम करण्याची मोकळीक मिळेल, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यात यावे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त्याने व्यक्त केले.
महिलांच्या सक्षमीकरणात अपवादात्मक योगदान देणार्‍या १५ महिला आणि सात संस्थांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करताना राष्ट्रपती म्हणाले की, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य मिळण्यातच समाजाचे आणि देशाचे हित आहे, ही सत्यता या देशातील पुरुषांनी नेहमीकरिताच लक्षात ठेवायला हवी आणि त्यानुसार त्यांनी महिलांबाबतची आपली मानसिकताही तयार करायला हवी.
ज्या सात संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यात हरयाणातील काही संस्थांचाही समावेश आहे. महिलांना घरात आणि कार्यालयात आपल्या इच्छेप्रमाणे काही करण्याची परवानगी दिली जात नाही, अशा तक्रारी माझ्या कानावर नेहमीच येत असतात. महिलांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी प्रतीक्षा का करावी, असे मला स्पष्टपणे वाटते. महिलांना मनमोकळेपणाने काम करता आले नाही, तर आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास होणार नाही, हे आपल्याला कळायलाच हवे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील चार महिलांना नारी शक्ती पुरस्कार
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महाराष्ट्रातील चार महिलांचा आज मंगळवारी नारीशक्ती पुरस्कार देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित या समारंभात १५ महिला आणि ५ संस्थांना राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील प्रिती पाटकर, ज्योती म्हापसेकर, शकुंतला मुजुमदार आणि सिस्टर ल्युसी कुरियन चार महिलांचा समावेश आहे.
प्रिती पाटकर या सामाजिक आणि मानवी हक्क कार्यकर्त्या असून, प्रेरणा संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. मुंबईतील वेशाव्यवसायात असणार्‍या महिलांच्या कल्याणाचे काम त्या गेल्या २८ वर्षांपासून करीत आहेत. ३० हजार वेश्यांच्या कल्याणासाठी प्रेरणा संस्थेने आतापर्यंत काम केले.
ज्योती म्हापसेकर या १९७८ पासून पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्या असून, स्त्री मुक्ती संघटनेच्या सहसंस्थापक आहेत. मुंबई आणि परिसरातील कचरा वेचणार्‍या कामगारांसाठी त्यांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय प्रारूप तयार केले असून, त्याची अंमलबजावणीही केली आहे.
सिस्टर ल्युसी कुरियन १८ वर्षांपासून महिला आणि बाल कल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत असून, माहेर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी निराधार महिलांसाठी काम केले आहे. २६९१ निराधार महिलांना माहेर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी निवारा दिला असून, २३३९ महिलांचे पुनवर्सन केले आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये त्यांनी ५२३ बचत गटांची स्थापना केली.
शकुंतला मुजुमदार या प्राणीमित्र असून, दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी मुक्या प्राण्यांची सेवा केली. ठाणेस्थित प्राणी कल्याण मंडळाच्या त्या संस्थापक आहेत. मुजुमदार यांनी प्राण्यांसाठी रुग्णालय सुरू केले असून, यात जखमी प्राण्यांवर नि:स्वार्थ भावनेने उपचार केले जातात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27129

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (730 of 2453 articles)


=१७ बँकांची सुप्रीम कोर्टात याचिका, आज सुनावणी= नवी दिल्ली, [८ मार्च] - अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी आणि सीबीआयच्या कचाट्यात सापडलेले ...

×