Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महिला सशक्तीकरण परिषद आजपासून

महिला सशक्तीकरण परिषद आजपासून

=लोकप्रतिनिधींचा सहभाग=
sumitra-mahajan1नवी दिल्ली, [४ मार्च] – महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ‘चला भारताचा विचार करू या’ शीर्षकाखाली उद्या शनिवापासून राजधानी दिल्लीत महिला लोकप्रतिनिधींच्या द्विदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी संसद भवन परिसरात आयोजित एका पत्रपरिषदेत दिली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्या शनिवार ५ मार्चला विज्ञान भवनात सकाळी ११ परिषदेचे उद्‌घाटन वाजता होणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहतील, असे महाजन यांनी सांगितले. बांगलादेश संसदेच्या सभापती डॉ. शिरीन चौधरी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
परिषदेचा समारोप रविवार ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यावेळी उपस्थित राहतील, असे स्पष्ट करत सुमित्रा महाजन म्हणाल्या की, या परिषदेत दोन्ही सभागृहांमधील महिला खासदार, विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला आमदार, महिला केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांच्या महिला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत चार वेगवेगळी सत्रेही होणार आहेत. बांगलादेश संसदेच्या अध्यक्ष शिरीन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या विशेष सत्रात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सहभागी होतील. या चर्चासत्राचे संचालन खा. पूनम महाजन करतील, असे सुमित्रा महाजन यांनी सांगितले.
लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या ‘सामाजिक विकासात महिलांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी उपस्थित राहतील. या चर्चासत्राचे संचालन खा. सुप्रिया सुळे करतील, असे महाजन यांनी सांगितले.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या आर्थिक विकासाच्या विषयावरील सत्रात अन्नप्रक्रिया राज्यमंत्री हरसिमरत कौर बादल आणि वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन सहभागी होतील. या चर्चासत्राचे संचालन खा. के. कविता करतील, अशी माहिती महाजन यांनी दिली.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सत्रात जलसंसाधन मंत्री उमा भारती, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई आणि दिल्ली सरकारच्या माजी मुख्य सचिव शैलजा चंद्रा उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्राचे संचालन खा. सुश्मिता देव करतील, असे महाजन यांनी सांगितले.
या परिषदेसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आमंत्रित करण्यात आले असल्याचे सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27016

Posted by on Mar 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (770 of 2453 articles)


=‘सेतू भारतम’ योजनेचा थाटात शुभारंभ= नवी दिल्ली, [४ मार्च] - रस्त्यांसाठी अधिग्रहित करण्यात येणार्‍या जमिनीच्या दोन्ही बाजूला रस्ते बांधून मधली ...

×