Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » मांझींना हायकोर्टाचा दिलासा

मांझींना हायकोर्टाचा दिलासा

=निर्णय घेण्याची परवानगी, अंमलबजावणीस नकार=
JITAN_RAM_MANJHIपाटणा, [१८ फेब्रुवारी] – पाटणा उच्च न्यायालयाने आधी दिलेल्या आपल्या निर्णयात बुधवारी सुधारणा केली असून, सध्या टांगती तलवार असलेले मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी त्याची अंमलबजावणी २१ फेब्रुवारीनंतरच करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्य न्यायाधीश एल. नरसिंह रेड्डी आणि न्या. विकास जैन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने जदयु आमदार नीरजकुमार यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला होता. आता मात्र निर्णय घेण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. परंतु, या निर्णयांची अंमलबजावणी २१ फेब्रुवारीनंतर करण्यात यावी, असे न्यायालयाने आपल्या सुधारित आदेशात स्पष्ट केले. जीतन राम मांझी शुक्रवार २० फेब्रुवारीला विश्‍वासमत प्रस्ताव मांडणार आहेत. हायकोर्टाने आपल्या आधीच्या आदेशात सुधारणा करावी, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती आणि या विनंतीवर विचार करून न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20664

Posted by on Feb 19 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (2046 of 2452 articles)


हजारोंनी दिला साश्रूनयनांनी निरोप ‘आर. आर. पाटील अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला अंजनी (तासगाव), [१७ फेब्रुवारी] - महाराष्ट्राचे लोकनेते, ...

×