Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा: मुख्यमंत्री

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा: मुख्यमंत्री

=मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला जिल्ह्याधिकार्‍यांशी संवाद=
FADNAVIS_DEVENDRA1मुंबई, [२८ मार्च] – राज्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांमधून शेततळ्याच्या मागणीसाठी सुमारे ७० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाचा जिल्हाधिकार्‍यांनी प्राथम्याने विचार करून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पीक विमा योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पाणी टंचाई आदींच्या स्थितीबाबत राज्यातील २१ जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच इतर संबंधित विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, शेततळ्यांची कामे सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असून राज्यातील इतर जिल्ह्यातही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे शेततळ्यांबाबतही मिशन मोडवर काम होणे आवश्यक आहे. शेततळ्यांच्या जागा निश्चितीबाबत राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची मदत घ्यावी.
जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या अभियानांच्या कामाला गती येणे महत्वाचे असून जलयुक्त शिवारच्या कामाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या अभियानासाठी आवश्यक तेवढा निधी जिल्ह्याला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी पूर्णपणे खर्च होणे गरजेचे असून जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण करत असतांना कामाची गुणवत्ता राखणेही महत्वाचे आहे. हे अभियान राबवितांना नियोजन करणे गरजेचे असून कोणतीही समस्या उद्भवल्यास गावकर्‍यांशी संवाद साधून समस्या सोडवण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाची संयुक्त बैठक घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
फडणवीस पुढे म्हणाले की, काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून आवश्यक तिथे टँकरने पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. अवैधरित्या पाणी पुरवठा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. पाण्याच्या संदर्भात येणार्‍या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टोल फ्री क्रमांक राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करुन द्यावा तसेच या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वॉर रुम’ ची स्थापना करावी तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी प्रत्येक जिल्हाधिकार्‍याने आपआपल्या जिल्ह्याचा सिंचन आराखडा तयार करावा. या आर्थिक वर्षात इंदिरा, रमाई आणि शबरी आवास योजनेअंतर्गत सुमारे २ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही घरकुलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली बांधली जावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27626

Posted by on Mar 29 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (553 of 2451 articles)


=सरसंघचालकांची स्पष्टोक्ती= लखनौ, [२८ मार्च] - ‘आमचे भव्य राष्ट्रनिर्माण व यश पाहूनच ‘भारत माता की जय’ असे सारेच विश्‍व म्हणू ...

×