Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू रूग्णालयात

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू रूग्णालयात

NAVJYOTSINGH SIDDHUनवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवज्योतसिंग सिध्दू यांना काल मंगळवारी रात्री दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योत सिध्दू यांना ‘डीप व्हेन थ्रमबोसिस’ हा आजार झाला आहे. हा आजार म्हणजे शरीरातील रक्तपुरवठा करणार्‍या पेशीमध्ये गुठळ्या निर्माण होतात.
योग्य वेळी या आजारावर उपचार झाले नाही तर त्यांच्या जिविताला धोका पोहोचू शकतो. या आजारात शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि महत्वाची इंद्रीय रक्ताअभावी निकामी होतात. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. रक्त पातळ व्हावे म्हण्ाून सिद्धू यांच्यावर उपचार सुरू असून शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांकडून ब्लड थिनर्सचे उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्राथमिक उपचारानंतर आता त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. मागील आठवड्‌यात कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान सिध्दू यांना दुखापत झाली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25031

Posted by on Oct 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1361 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] - केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील १० शहरांचे आराखडे तयार करण्यासाठी सल्लागार कंपन्यांची नेमणूक ...

×