Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » मानवाचे धूमकेतूवर यशस्वी पाऊल

मानवाचे धूमकेतूवर यशस्वी पाऊल

dhumketuडार्मस्टॅण्डट, [१३ नोव्हेंबर] – चंद्र, मंगळापर्यंत यशस्वी झेप घेणार्‍या मानवाने आता थेट आपले पाऊल फिरत्या धूमकेतूवर ठेवले आहे. युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने ‘फिली’ हा यंत्रमानव यशस्वीरित्या ६७ पी/ च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्का’ या धूमकेतूवर उतरवला आहे.
रोसेटा या अवकाशयानातून ‘फिली’ला धूमकेतूवर उतरविण्यात आले. युरोपीयन प्रमाणवेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास फिली धूमकेतूवर उतरला. अवकाश संशोधन क्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची घटना असून, या मोहिमेद्वारे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने एक नवी उंची गाठली आहे.
फिलीचा प्रवास दशकभरापूर्वी म्हणजे मार्च २००४ मध्ये सुरू झाला होता. २००४ मध्ये रोसेटा अवकाशयान ६७ पी/ च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्का धूमकेतूच्या दिशेने झेपावले होते. तब्बल पाच अब्ज किमीचा प्रवास करून, दहावर्षांनी रोसेटा धूमकेतूनजवळ पोहोचले.
जगभरातील अवकाश संशोधन संस्थांचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते. कारण फिरत्या धूमकेतूवर यंत्रमानव उतरवणे म्हणजे एक आव्हान होते. फिली धूमकेतूकर विशिष्ट वेळेत पोहचू न शकल्याने युरोपियन अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले होते. पण शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या फिलीला ६७/पी च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्काच्या बर्फाळ पृष्ठभागावर उतरवले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18204

Posted by on Nov 14 2014. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2344 of 2466 articles)


आयुक्तांनी वाचविले २८ गोधनांचे प्राण फौजदारी टाळण्यासाठी कॉंग्रेसचा दबाव विमानतळाजवळील ६ पत्राशेड हटविले सोलापूर, [१३ नोव्हेंबर] – बेधडक आणि ...

×