Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मानवी हक्कांची पायमल्ली सुरूच

मानवी हक्कांची पायमल्ली सुरूच

=आज मानवी हक्क दिन=
WHRD World Human Rights Dayन्यूयॉर्क, [९ डिसेंबर] – दहशतवाद, युद्ध, विविध प्रकारचे भयंकर गुन्हे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अशा अनेक मार्गांनी जगभरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून आजही मानवी हक्कांची पायमल्ली सुरूच असल्याचे विदारक चित्र मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने दिसून येत आहे.
ऍम्नेस्टी इंटरनॅशनलद्वारे १६० देशांमध्ये गेल्या वर्षभरातील विविध घटनांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०१४ मध्ये जगात सुमारे १८ लहान-मोठी युद्धे झाली. ३५ हून अधिक देशांमध्ये विविध घटनांमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली. युरोपात पोचण्याचा प्रयत्न करणारे तब्बल ३४०० निर्वासित भूमध्य समुद्रात बुडाल्याचे मानले जात आहे. तर सीरियामधील चार दशलक्ष निर्वासितांपैकी ९५ टक्के नागरिक शेजारील देशांमध्ये पळून गेले. १६० देशांपैकी ११९ देशांच्या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, अनेक ठिकाणी वर्तमानपत्रे बंद पाडण्यात आली तर अनेक पत्रकारांना धमकावण्याच्या घटना घडल्या. ६२ देशांमध्ये हक्क आणि स्वातंत्र्याची मागणी करणार्‍यांना गजाआड करण्यात आले. ५८ टक्के देशांमध्ये अद्याप लाखो पीडितांना न्याय मिळालेला नाही. ८२ टक्के देशांत नागरिकांना विविध कारणांनी धमकावले जात आहे. स्त्रियांवरील जाचक अटींमधील एक महत्त्वाची अट म्हणजे गर्भपातावर बंदी. आज जगातील तब्बल २८ देशांमध्ये कोणत्याही कारणास्तव स्त्रियांच्या गर्भपातावर बंदी घालण्यात आली आहे. अगदी बलात्काराच्या पीडिता असोत किंवा स्त्रियांच्या जीवनमरणाचा, आरोग्याचा प्रश्‍न असो, गर्भपात करण्यास कायद्याने बंदी घालणारे २८ देश आहेत. याशिवाय आजच्या काळातील प्रश्‍न म्हणजे समलिंगी संबंध ठेवणार्‍यांना न्याय व समान हक्क. मात्र, आजही १६० पैकी ७८ देशांमध्ये दोन प्रौढ नागरिकांमधील समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवत त्यांच्या स्वतंत्रपणे जगण्याच्या अधिकारावरच गदा आणली जात आहे.
म्हणून साजरा होतो दिन
दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे झालेली मानवी जीवनाची वाताहत व तत्पूर्वी नाझी जर्मनांनी केलेली तब्बल ६० लाख ज्यूंची हत्या यामुळे जगभरातील संवेदनशील नागरिक, अभ्यासक, विचारवंत विषण्ण झाले व त्यांच्याकडून मानवी हक्कांचे जतन करण्याची संकल्पना समोर आली. परिणामी संयुक्त राष्ट्रसंघाने १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी हक्कांचा सार्वभौम जाहिरनामा घोषित केला. याद्वारे जगातील प्रत्येक नागरिकाला नागरी व राजकीय मानवी हक्क आणि त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्क प्रदान करणारे जाहीरनामे क्रमाने जाहीर केले गेले. हे सर्व जाहीरनामे स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत तत्वांशी निगडीत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26073

Posted by on Dec 10 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1058 of 2458 articles)


मुंबई, [९ डिसेंबर] - मुंबईचे पत्रकार बालकृष्णन यांनी धमक्यांना भीक न घालता अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केलीच. ...

×