Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मान्सून केरळमध्ये दाखल

मान्सून केरळमध्ये दाखल

MANSOON-OPEDCLOUDपुणे, [८ जून] – रखरखत्या उन्हामुळे जिवाची लाही लाही झाल्यानंतर संपूर्ण देश ज्या नैॠ त्य मोसमी पावसाची वाट पाहात होता तो मान्सून आज बुधवारी केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळ व लक्ष्यद्विपच्या किनार्‍यावर दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
यापूर्वी मान्सून एक जूनला दाखल होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र अंदमानात मान्सून रखडण्याची चिन्हे दिसल्यानंतर गुरुवारपर्यंत मान्सून दाखल होणार असा अंदाज आयएमडीने मंगळवारी बांधला होता. पण आयएमडीने दिलेल्या अंदाजाच्या एक दिवसा आधीच मान्सून केरळच्या किनार्‍यावर दाखल झाला. तिरुअनंतपुरमसह केरळमध्ये जोरदार पाऊस होत आहे. केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची घोषणा कुठल्याही क्षणी होईल अशी शक्यता होती. आज सकाळी हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाची वर्दी दिली. मंगळवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, श्रीलंकेचा दक्षिण भाग, मालदीव, कोमोरिन भाग आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात प्रगती केली होती.
दरम्यान, दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व दमदार पाऊस कोसळला आहे. मराठवाडा व विदर्भातही काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. पुढील ४८ तासांत दक्षिण तामिळनाडू आणि उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28538

Posted by on Jun 8 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (255 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ जून] - राज्यसभेच्या ५७ पैकी ३० जागांवरील उमेदवार अविरोध विजयी झ्राले असून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तराखंड, कर्नाटक, ...

×