|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.94° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.35°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.43°C - 30.72°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.92°C - 29.33°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.48°C - 29.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.57°C - 29.3°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.06°C - 29.3°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई

माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई

=किरीट सोमय्यांची शिवसेनेच्या मुखपत्राला नोटीस=
kirit-somaiya_2मुंबई, [१६ मे] – भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सामना या वृत्तपत्राने ४८ तासांत विनाअट माफी मागून त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातमीइतकीच प्रसिद्धी द्यावी, अन्यथा या वृत्तपत्राच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, असा इशारा कायदेशीर नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.
दै. सामना या वृत्तपत्राने रविवार, १५ मे २०१६ रोजीच्या अंकात पहिल्या पानावर ‘बिनबुडाच्या किरीट सोमय्यांचा घोटाळा’ अशा शीर्षकाची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्या संदर्भात खा. सोमय्या यांच्या वतीने ध्रुव लिलाधर आणि कंपनी या सॉलिसिटर फर्मने सामनाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सांताक्रूजमधील एका बांधकामाच्या संदर्भात या वृत्तपत्राने खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केली आहे. प्रत्यक्षात खा. सोमय्या व त्यांच्या कुटुंबियांचा मेधा बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स या कंपनीशी अथवा मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन अथवा पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध नाही. या बातमीला अशी ठळक प्रसिद्धी देण्यापूर्वी संबंधित वृत्तपत्राच्या संपादकाने अथवा बातमीदाराने खा. सोमय्या यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थितीची शहानिशा करण्याची तसदी घेतली नाही. अर्थातच खा. सोमय्या यांची बदनामी करण्यासाठीच बातमीत आरोपांना प्रसिद्धी देण्यात आली.
कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्ट मागणी केली आहे की, सामनाने या बातमीबद्दल ४८ तासांत खा. सोमय्या यांची माफी मागावी व त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मूळ बातमीएवढ्याच जागेत व तशीच ठळकपणे प्रसिद्धी द्यावी. अशी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधित बातमीदार, तसेच संपादकांवर कारवाई करावी व त्याची माहिती खा. सोमय्या यांना लेखी कळवावी. असे केले नाही तर दै. सामना तसेच संपादक व बातमीदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यात देण्यात आला आहे

Posted by : | on : 16 May 2016
Filed under : ठळक बातम्या, मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g