Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मार्च २०१६ पर्यंत पोस्टातर्फे हजार एटीएम

मार्च २०१६ पर्यंत पोस्टातर्फे हजार एटीएम

atm1नवी दिल्ली, [१८ जानेवारी] – आर्थिक वर्ष २०१६ संपेपर्यंत पोस्टातर्फे देशभरात १००० एटीएम सुरू करण्याचा आणि सर्व २५ हजार पोस्ट ऑफिसेसमध्ये कोअर बँकिंग सेवा सुरू करण्याची योजना बनवण्यात आली आहे.
सध्या १२,४४१ पोस्ट ऑफिसेसमध्ये कोअर बँकिंग सेवा सुरू करण्यात आली असून ३०० एटीएम सुरू करण्यात आल्याची माहिती एका पोस्ट अधिकार्‍याने दिली.
देशभरात २५ हजार विभागीय पोस्ट कार्यालये
पोस्टखात्याअंतर्गत सध्या देशभरात २५ हजार विभागीय पोस्ट कार्यालये आणि १.३० लाख ग्रामीण पोस्ट कार्यालये आहेत. हे सर्व कोअर बँकिंगद्वारे जोडल्यानंतर सर्वसामान्यांना आपले खाते कुठूनही वापरता येऊ शकेल.
सौरऊर्जेवरील उपकरणांचा होईल वापर
सौरऊर्जेवर चालणार्‍या उपकरणांचाही वापर केला जाणार आहे. ग्रामीण पोस्ट ऑफिसेसबाबत अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार सर्व १.३० लाख पोस्टांमध्ये मार्च २०१७ पर्यंत सौरऊर्जेवर चालणार्‍या बायोमेट्रिक उपकरणांचा वापर सुरू केला जाईल. ही उपकरणे हाताने वापरली जाणार असल्याने त्यासाठी विजेची गरज भासणार नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26566

Posted by on Jan 19 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (896 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१८ जानेवारी] - पुढील आर्थिक वर्षात सरकारला निधीची कमतरता भासणार असल्याने, कोट्यवधी रुपयांचा बोजा टाकणार्‍या सातव्या वेतन आयोगाच्या ...

×