Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मालेगाव स्फोट: न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा

मालेगाव स्फोट: न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा

=कॉंग्रेसची मागणी=
Anand-Sharmaनवी दिल्ली, [१५ मे] – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या नव्या आरोपपत्रामुळे दहशतवादाविरोधात लढाईच्या भारताच्या कटिबद्धतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे, असा दावा कॉंग्रेस पक्षाने केला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची घोषणा करून आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी येथे केली. एनआयए आता नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी झाली आहे, असा आरोपही शर्मा यांनी केला. एनआयएने दाखल केलेले आरोपपत्र म्हणजे मुंबई एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी केलेल्या सखोल तपासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आहे. एनआयएने मोक्काअंतर्गत लावण्यात आलेले आरोप मागे घेतल्यामुळे एटीएसने रेकॉर्ड केलेले बयाण पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे आनंद शर्मा म्हणाले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सहा आरोपींना क्लीन चिट देण्याच्या एनआयएच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शर्मा यांनी केली. एनआयएने घेतलेली भूमिका हेमंत करकरे यांचे बलिदान नाकारणारी असून, पंतप्रधान मोदी यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28247

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (350 of 2453 articles)


-श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह केले आंतरराष्ट्रीय विचार कुंभ समारोपात मार्गदर्शन= [caption id="attachment_28245" align="alignleft" width="300"] Ujjain: Prime Minister Narendra Modi and President of ...

×