Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » माल्दातील आरोपींवर कठोर कारवाई करू

माल्दातील आरोपींवर कठोर कारवाई करू

=राजनाथसिंह यांचे आश्‍वासन=
RAJNATH SINGHकोलकाता, [२१ जानेवारी] – पश्‍चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नॉर्थ २४ परगणा येथे भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुरुवातीला त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नमन करीत माल्दातील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा विश्‍वास उपस्थित नागरिकांना दिला.
राज्यातील ममता सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, बंगालमध्ये ‘मॉं, माटी व मानुष’ संरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच माल्दातील घटनेमागे ज्यांचे कोणाचे हात असतील त्या गुन्हेगारी हातांना शोधून काढून त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन देत तेथे जे काही घडले त्यामुळे आपल्याला अतीव दु:ख होत असून यावरून ज्या प्रदेशात स्वत: पोलिसच सुरक्षित नाही तेथे अन्य जनतेची काय अवस्था असेल, हे दिसून येते. राज्यात सध्या तृणमूल कॉंग्रेस फक्त तुष्टीकरणाचे राजकारण करीत असल्याचे जाणवत असल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
घुसखोरांना प्रत्युत्तर
घुसखोरांच्या समस्येवर गृहमंत्री म्हणाले की, शेजारी देशांकडून होणार्‍या घुसखोरीला सडेतोड उत्तर कोण देत असेल तर ते बीएसएफचे जवान. मात्र, या घुसखोरीला रोखणे अति आवश्यक असून त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करीत आहोत. यासाठी थोडा वेळ लागेल पण आमच्या सीमांना सुरक्षित केले जाईल, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26614

Posted by on Jan 22 2016. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (882 of 2452 articles)


=मौलाना मसूदप्रकरणी पाकची बनवाबनवी= नवी दिल्ली, [१९ जानेवारी] - पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर गेल्या २ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी ...

×