Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » माल्यांकडून पै पै वसूल करणार : जेटली

माल्यांकडून पै पै वसूल करणार : जेटली

arun-jaitley2नवी दिल्ली, [१० मार्च] – अनेक सार्वजनिक बँकांचे हजारो कोटी रुपये बुडविल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय माल्या यांना भाजपाप्रणीत रालोआ सरकार शांततेत जीवन जगू देणार नाही आणि त्यांच्याकडून पै न पै वसूल केली जाईन, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिली.
विजय माल्या यांनी २ मार्च रोजीच देशातून पलायन केले आणि सीबीआयने विजय माल्यांविरोधात जारी केलेली लुकआऊट नोटीस संबंधित संस्थांना उशिरा मिळाली, असे अरुण जेटली यांनी या मुद्यावर विरोधकांनी केलेल्या प्रश्‍नांच्या भडिमाराला उत्तर देताना सांगितले.
‘विजय माल्या यांना त्यांची खाती व्यवस्थित नसतानाही बँकिंग सुविधेच्या माध्यमातून सर्वप्रथम २००४ मध्ये कर्ज देण्यात आले. मात्र, आमचे सरकार माल्यांकडून एकेक पैसा वसूल करेल, असे आश्‍वासन मी देऊ इच्छितो, असे जेटली म्हणाले. सध्या सीबीआयचा तपास सुरू आहे आणि याप्रकरणी न्याय मिळेल, असेही जेटलींनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून विजय माल्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापूर्वीच विजय माल्या यांनी भारत सोडला. माल्यांकडून प्रत्येक पैसा वसूल करण्यासाठी बँकाही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत, असेही जेटली म्हणाले.
विजय माल्यांना अशाप्रकारे पळून जाता येणार नाही. देशाचा पैसा अशाप्रकारे लुटणार्‍या कोणालाही रालोआ सरकार स्वस्थपणे झोपू देणार नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संसदभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. थकित कर्जाच्या अनेक प्रकरणांची सुनावणी सुरू असलेल्या माल्यांना देशातून पळू जाऊ देण्यात फौजदारी स्वरूपाचा कट आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी सभागृहात केला. अनेक संस्था माल्यांचा तपास करत असताना त्यांना अटक का करण्यात आली नाही, त्यांचा पासपोर्ट जप्त का करण्यात आला नाही, असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी शून्यप्रहरात उपस्थित केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27212

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (702 of 2453 articles)


=आठ हजार कोटींचा खर्च= नवी दिल्ली, [१० मार्च] - ग्रामीण कुटुंबातील महिला सदस्याला मोफत घरगुती गॅसचे (एजपीजी) कनेक्शन देण्याची तरतूद ...

×