Home » क्रीडा, ठळक बातम्या » मिल्खा सिंग अकोल्यात धावणार

मिल्खा सिंग अकोल्यात धावणार

Milkha-Singhअकोला, [४ जानेवारी] – विश्‍वविख्यात माजी धावपटू व फ्लाईंग सिख म्हणून ओळखला जाणारा मिल्खा सिंग यंदा अकोलावासींसोबत धावणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने व अकोल्यातील विविध शंभर स्वयंसेवी संघटनाच्या सहकार्याने ११ जानेवारी रोजी अकोला येथे आयएसए वॉकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या आयोजनप्रसंगी अवयव दान, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री जनधन योजना याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. अवयव दानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे डॉ. रवी वानखडे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार असल्याचे आयएसए वॉकाथॉनचे मुख्य संयोजक डॉ. प्रशांत मुळावकर यांनी सांगितले. वॉकाथॉनचे अध्यक्ष डॉ. विजय खेरडे, सचिव डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. सत्यन मंत्री, उपाध्यक्ष के. के. अग्रवाल, डॉ. संदीप चांडक, डॉ. पराग टापरे, डॉ. जुगल चिराणिया, डॉ. अजय चव्हाण, डॉ. अविनाश पाटील, डॉ. दीपक भट, डॉ. गिरीधर पनपालिया यावेळी उपस्थित होते. ११ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता आयएमए सभागृहापासून स्पर्धा सुरू होणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. श्रीकांत देशपांडे, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आदी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील. ३, ६ व १० किमी अंतराची ही स्पर्धा राहणार असून त्यासाठी तीन वेगवेगळे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. अल्पोपहार, औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पंच म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंच समिती नियुक्त करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19451

Posted by on Jan 5 2015. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2287 of 2455 articles)


दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाच्या प्रचारात उतरणार सिनेकलावंत नवी दिल्ली, [४ जानेवारी] - निवडणूक आयोगाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा ...

×