Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मिशेल ओबामांकडून डॉ. शेट्टी यांना विशेष आमंत्रण

मिशेल ओबामांकडून डॉ. शेट्टी यांना विशेष आमंत्रण

michelle obamaवॉशिंग्टन, [२० जानेवारी] – अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉ. प्रणव शेट्टी यांना आमंत्रित केले आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उद्या बुधवारी राष्ट्राला संबोधित करणार असून यावेळी मिशेल यांच्या विशेष कक्षात बसून हे भाषण ऐकण्यासाठी काही खास व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले असून त्यात डॉ. शेट्टी यांचा समावेश आहे.
पश्‍चिम आफ्रिकेतील ‘इबोला’ या दुर्धर रोगाशी लढा देण्याच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. शेट्टी हा सन्मान मिळविणारे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चमूचे पहिले अनिवासी भारतीय ठरले आहेत. अमेरिकन संसदेत राष्ट्राध्यक्ष ओबामा राष्ट्राला उद्देशून संबोधन करतात. दुसरीकडे यावर्षी प्रथमच एक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. शेट्टी यांना मिळालेले आमंत्रण विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
डॉ. शेट्टी हे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चमूचे जागतिक आकस्मिक आरोग्य समन्वयक पदावर कार्यरत आहेत. ही चमू पश्‍चिम आफ्रिकेतील इबोलाच्या साथीला तोंड देण्याचे कार्य अमेरिकेच्या पाठिंब्याने करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात डॉ. शेट्टी यांना लिबेरियातील दोन इबोला प्रतिबंधक उपाययोजना केंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आले होते. ही केंद्रे फिरती असल्याने देशभरात कुठेही इबोलाचा उद्रेक झाल्याचे आढळताच या केंद्रातील चमू त्या ठिकाणी दाखल होत असे. याशिवाय, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्यविषयक कर्मचारी आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे कामही या केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येत होते. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणानंतर हे आरोग्य सेवक इबोलासोबत लढा देण्यात आघाडीवर आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटी डॉ. शेट्टी अमेरिकेत परतले असून फेब्रुवारीत ते पुन्हा पश्‍चिम आफ्रिकेतील गिनिया येथे जाणार असून त्या ठिकाणी डॉ. शेट्टींच्या नेतृत्त्वात इबोला उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. इबोलाची साथ येण्याआधी त्यांनी हैती, लिबिया, दक्षिण सुदान, जॉर्डन, इराक आणि फिलीपाईन्समधील आकस्मिक आरोग्य समस्यांना तोंड देण्याचे काम केले आहे. डॉ. शेट्टी हे अमेरिकेत प्रशिक्षण घेतलेले आकस्मिक औषधांविषयक डॉक्टर असून त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
राष्ट्राध्यक्षांचे संबोधन ऐकण्यासाठी प्रथम महिला मिशेल यांनी विविध क्षेत्रात कार्यरत चोवीसपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात अंतराळवीर स्कॉट केली यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19835

Posted by on Jan 21 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2209 of 2458 articles)


=जागतिक नाणेनिधीचा अहवाल= वॉशिंग्टन, [२० जानेवारी] - भारत यावर्षी ६.३ टक्के या सरासरीने आर्थिक विकास साध्य करेल आणि पुढील आर्थिक ...

×