Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मी घाबरले नाही : सोनिया गांधी

मी घाबरले नाही : सोनिया गांधी

=हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यातील आरोप निराधार=
SONIA GANDHI1नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या हवाई सफारीसाठी ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून १२ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या व्यवहारात ३६० कोटी रुपयांची लाचप्रकरणी इटलीतील न्यायालयाने संपुआ सरकार आणि कॉंगे्रसमधील वरिष्ठ नेतृत्वावर ठपका ठेवल्याने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असतानाच, ‘माझ्यावरील आरोप निराधार आहेत, मी अजीबात घाबरले नाही,’ अशी प्रतिक्रिया कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज बुधवारी दिली.
मी काहीच चुकीचे केले नसून, माझ्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. त्यांना माझे नाव घेऊ द्या… मी मुळीच घाबरणार नाही, कारण माझ्यावरील आरोपच असत्य आणि निराधार आहेत, असे सोनिया गांधी यांनी संसदभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपाप्रणीत रालोआ सरकार गेल्या दोन वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आहे. या काळात सरकारने या घोटाळ्याची चौकशी का पूर्ण केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आरोपांत तथ्य नाही : मनमोहनसिंग
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे आणि यात कुठलेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. मी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याने मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कोणत्याही चौकशीचा सामना करण्याची माझी तयारी आहे, असे मनमोहनसिंग यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28041

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (421 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोडसाळ असून हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम ...

×