Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » मी व राज एकत्र का आलो, हे सांगाच!

मी व राज एकत्र का आलो, हे सांगाच!

=गडकरी यांचा मीडियाला टोला=
नाशिक, (२२ फेबु्वारी) – विकासाच्या, नावीन्यपूर्ण कल्पना मला जिथेकुठे दिसून येतात, त्या सर्वच ठिकाणी जाण्याचे मला आधीपासून आवडते. मी नेहमीच चांगल्या कामांसाठी लोकांच्या पाठिशी उभा असतो.नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यामागेही नेमके तेच कारण आहे.त्यामुळे प्रसारमाध्यमांनी यातून वेगळा अर्थ काढू नये. मी आणि राज एकत्र आल्याचे वृत्त नक्की प्रकाशित करा, पण आम्ही एकत्र का आलो तेदेखील आवर्जुन सांगा,अशा शब्दात भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्रकारांना टोला हाणला.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरात गोदेपार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेले नितीन गडकरी यांनी येथे कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही. गडकरी यांनी नेहमीच्या शैलीत विकास, इनोव्हेशन, व्हिजन, पर्यटन, रोजगारनिर्मिती, नाविन्याचा ध्यास याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज ठाकरेंनी आपल्या छोटेखानी प्रास्ताविक भाषणात विकासाची भाषा बोलणारा एकमेव नेता म्हणून गडकरी यांचे भरभरून कौतुक केले.नितीन गडकरी यांच्यासारखा माणूस मंत्री नसता तर मुंबईतील उड्डाणपुल,मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उभेच राहू शकले नसते, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी गडकरी यांच्या कामांचे कौतुक केले.
हाच धागा पकडून गडकरी म्हणाले की,मी मुंबईतील उड्डाण पूल, वरळी सी-लिंक व एक्स्प्रेस वे उभा केला,हे खरे असले,तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापाठोपाठ राज ठाकरे यांचेही त्याकडे बारकाईने लक्ष होते. राज ठाकरे नेहमीच विकासाबाबत बोलत आले आहेत. मीदेखील त्याचाच विचार करतो. विकास हेच राजकारण असते. भाजपा नेहमीच विकासाचे राजकारण करीत असते. विकासात राजकारण आणत नाही, असे गडकरींनी सांगितले.
आपल्या देशात आज सर्वच काही आहे.अभाव आहे राजकीय नेतृत्त्वाचा, नाविन्याच्या ध्यासाचा आणि नियोजनाचा. भारतात नद्या आहेत, जंगले आहेत, जमीन आहे, खूप काही करता येईल, असा ‘सुजलाम सुफलाम’ आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. त्यासाठी राजकारण न आणता चांगले काम करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत नाशिकमधील गोदेपार्कचा प्रकल्प उत्तम असल्याची पोचपावती गडकरी यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11342

Posted by on Feb 23 2014. Filed under उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या (2439 of 2451 articles)


नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) - भारतीय बाजारपेठेतील संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा लागली असून, अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रातून बाहेर ...

×