Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुंबईत मॉडेलच्या हत्येने खळबळ

मुंबईत मॉडेलच्या हत्येने खळबळ

shikha joshiमुंबई, [१७ मे] – येथील वर्सोवा येथे टीव्ही मालिका आणि सिने अभिनेत्री-मॉडेल म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखा जोशी हिचा शनिवारी रात्री राहत्या घरी बाथरूममध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
धारदार शस्त्राने गळा चिरून तिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार तिने आत्महत्या केली असावी, असे सांगण्यात आले. शिखाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्यापूर्वीच तिच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार, शिखा गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्याखाली होती, असे तिच्या मैत्रिणीने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मात्र समजलेल्या माहितीनुसार तिचे संपूर्ण कुटुंबीय दिल्लीमध्ये वास्तव्यास आहे. आधी मुंबईत राहणारी पण नंतर परत दिल्लीला गेलेली शिखा ३ महिन्याआधी एका शस्त्रक्रियेसाठी मुंबईला आली होती. ‘बीए पास’ या सिनेमासह तिने अनेक मालिकांमध्येही अभिनय केला होता. २०११ मध्ये तिने एका डॉक्टवर उपचारादरम्यान विनयभंग केल्याचा आरोप केला होता. या डॉक्टरने आजवर बॉलिवूडमधील अनेकांची शस्त्रक्रिया केली आहे.
तीन वर्षापूर्वी तिने अमेरिकेतील एका एनआरआयशी लग्नही केले होते. मात्र तो अमेरिकेत गेल्यानंतर पुन्हा कधीही भारतात परतला नाही. त्या नैराश्यातून तर ही घटना घडली नसावी ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22589

Posted by on May 18 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1685 of 2452 articles)


ओव्हरटाईम गुन्हा असेल, तर वारंवार करणार शांघायमध्ये भारतीयांना नरेंद्र मोदींचे संबोधन तुमचा आशीर्वाद घेण्यासाठीच आलो = शांघाय, [१६ मे] ...

×