Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुंबईत लेप्टोची साथ, १२ बळी

मुंबईत लेप्टोची साथ, १२ बळी

leptospirosisमुंबई, [८ जुलै] – पहिल्या पावसानेच मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून या पावसाचे दुष्परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई शहरावर लेप्टोच्या साथीचे सावट पसरले आहे. साचलेल्या पाण्यात प्राण्यांचे मलमूत्र मिसळून होणार्‍या बाधेमुळे लेप्टोचे जिवाणू शरीरात प्रवेश करून अवघ्या सात दिवसात बारा जणांचा बळी गेला आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून मुंबईत अजूनही लेप्टोचे बळी जाण्याची शक्यता वर्तविली आहे. या साथीचे रूग्ण प्रामुख्याने गोरेगाव ते दहिसर भागात आढळले आहेत. गेल्या आठवड्याभरात लेप्टोस्पायरोसिसचे २१ रूग्ण आढळले असून त्यापैकी एक वगळता बाकी सर्व मृत्यू गोरेगाव ते दहिसर भागात झाले आहेत. या भागातील २७५५ घरांच्या पाहणीत आढळून आलेल्या १० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुराच्या पाण्यात जमिनीखालील उंदीर मरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यावर लेप्टोचे रूग्ण वाढल्याचे दिसते. मात्र मागील चार वर्षाच्या तुलनेत या वेळी केवळ एकाच आठवड्यात लेप्टोच्या मृत्यूंची संख्या तिप्पट आहे. जूनपासून नोंद झालेल्या २६ रूग्णांपैकी जुलै महिन्यातच १२ जणांचा बळी गेला आहे. यात १३ वर्षाखालील एका मुलाचा, १३ ते ३० वयोगटातील सात जणांचा तर ३१ ते ४५ वयोगटातील तिघांचा व त्यावरील वयोगटातील एकाचा समावेश आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, घुशी, कुत्रा, बदके आदींचे मलमूत्र मिसळले गेल्याने व्यक्तीच्या जखम झालेल्या भागाला या बाधित पाण्याचा संपर्क झाल्यास आजार होण्याची शक्यता असते. लेप्टोच्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर आजाराची लक्षणे दिसण्यासाठी ३ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. या रूग्णावर ३ ते २१ दिवसांत योग्य उपचार व निदान होऊ न शकल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साधा ताप किंवा डोकेदूखी, पोटात मळमळणे, अंग दुखणे जरी असेल तरी रूग्णालयात जाऊन तपासणी करावी व उपचार करून घ्यावा. परस्पर औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23334

Posted by on Jul 9 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1571 of 2452 articles)


ललित मोदीला एक हजार कोटी दिले होते अल-कायदाशी संबंध गुजराती वृत्तवाहिनीने घेतली दाऊदची मुलाखत नवी दिल्ली, [८ जुलै] - ...

×