Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुंबईत हाय अलर्ट, सिद्धीविनायक हिटलिस्टवर

मुंबईत हाय अलर्ट, सिद्धीविनायक हिटलिस्टवर

=२८ जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता=
siddhivinayak-temple-mumbaiमुंबई, [२२ जानेवारी] – मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २८ जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. यावेळी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मंगळवारी सिद्धीविनायक मंदिरात गर्दी असते, ही संधी साधूनच हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘जमात – ऊल – दावा’, लष्कर – ए – तैयबा’, ‘जैश – ए- मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या असून या चार टीमपैकी एक एक टीम महाराष्ट्र,राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उडिशात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत हल्ला करण्याची जबाबदारी अब्दुल्ला – अल कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या अतिरेक्यांवर सोपविण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19878

Posted by on Jan 21 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2195 of 2452 articles)


=ओबामा यांचे आवाहन, अफगाणमधून सैन्य माघारीची घोषणा= वॉशिंग्टन, [२१ जानेवारी] - पाकिस्तानच्या पेशावर येथील सैनिकी शाळेपासून तर पॅरिसच्या रस्त्यांपर्यंत इस्लामिक ...

×