Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मुंबई-बंगळुरू सर्वाधिक स्वस्त शहर

मुंबई-बंगळुरू सर्वाधिक स्वस्त शहर

bangalore-cityनवी दिल्ली, [१२ मार्च] – भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे शहर राहण्यासाठी नेपाळची राजधानी काठमांडूपेक्षाही स्वस्त आहे. ‘इकॉनॉमिस्ट’च्या इन्टेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केले असून, त्यात २०१५ मधील राहणीमानावर आलेला खर्च पायाभूत मानण्यात आला आहे.
जगातील सर्वाधिक महागड्या १३३ शहरांमध्ये भारतातील मुंबई आणि दिल्लीसह चार शहरांचा समावेश असून, अन्य देशांतील महानगरांच्या तुलनेत भारत हा खिशाला परवडणारा देश ठरला आहे.
२०१५ मध्ये राहणीमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. चलनांतील घसरण, वस्तूंचे कमी झालेले दर, राजकीय उलथापालथ यांचा थेट परिणाम जीवनमूल्यावर झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकूण १३३ शहरांची ही यादी असून, पहिल्या स्थानी सिंगापूर तर सर्वांत शेवटचा क्रमांक झांबियाची राजधानी लुसाका या शहराला मिळाला आहे. त्यामुळे लुसाका जगातील सर्वांत स्वस्त शहर ठरले आहे. लुसाकानंतर भारतातील बेंगळुरू १३२ व्या आणि मुंबई १३१ व्या क्रमांकावरील सर्वाधिक स्वस्त शहरे ठरली आहेत. या यादीत दिल्ली १२६ व्या, तर चेन्नई १२७ व्या स्थानी आहे. पाकिस्तानातील कराची या एकमेव शहराचा यादीत १२७ व्या क्रमांकावर समावेश आहे.
दुसरीकडे डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने अमेरिकेतील १६ शहरे आधीपेक्षा महाग झाली आहेत. यादीत न्यूयॉर्क सर्वाधिक महागड्या शहरांमध्ये सातव्या स्थानी आहे. रियो द जनेरो या आगामी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषविणार्‍या शहराची महागाईच्या यादीत घसरण झाली असून हे शहर ११३ व्या स्थानी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27228

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (695 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ मार्च] - इशरत जहॉं प्रकरणी गुजरातमधील पोलिसांवर सुरू असलेले खटले आणि त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करण्याची ...

×