Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपी दोषी

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपी दोषी

=तब्बल नऊ वर्षांनंतर निकाल लागला=
mumbai-high-courtमुंबई, [११ सप्टेंबर] – ११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकल रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने आज शुक्रवारी निर्णय दिला आहे. यात १३ आरोपींपैकी १२ जणांना हत्येच्या गुन्हयामध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. तब्ब्ल नऊ वर्षांनंतर या प्रकरणी निकाल आला आहे. न्यायाधीश वाय. डी. शिंदे निकालपत्राचे वाचन करीत आहेत.
या आरोपींना १२०(ब), ३०२ आणि ३११ कलमाअंतर्गत दोषी धरण्यात आलं आहे. या आरोपींमध्ये कमल अहमद अन्सारी, अन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, एहतेशाम सिद्दीकी, मोहम्मद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, मुझम्मिल शेख, सोहेल महमूद शेख, झमीर अहमद शेख, नावेद हुसेन खान आणि आसिफ खान यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील अब्दुल वाहीद शेखला निर्दोष ठरविण्यात आलं आहे.
११ जुलैला पश्‍चिम रेल्वेच्या सात उपनगरीय गाड्‌यांमध्ये संध्याकाळी अकरा मिनिटांत सात बॉम्बस्फोट झाले होते. यात १८९ प्रवासी ठार झाले तर ८२४ प्रवासी जखमी झाले होते. जखमी झालेल्या पैकींना कायमचे अपंगत्व आले. या स्फोटात सामील असलेल्यांना मुंबईतील दहशतवादी विरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह एकूण १३ जणांना अटक केली होती. त्यांच्यावर विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी पक्षाने या प्रकरणी एकूण ६००० पानांचे पुरावे सादर केले असून २५० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23763

Posted by on Sep 11 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1485 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] - देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अर्धा ते एक टक्का कपात करण्याची ...

×